Yuvraj Singh - Ashish Nehra Sakal
क्रिकेट

IPL 2025: नेहराची गुजरात टायटन्सशी सुटणार साथ, तर युवराजची होणार एन्ट्री? नवे अपडेट्स आले समोर

Pranali Kodre

Ashish Nehra likely to leave Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. अशात सर्वच संघात मोठे बदल दिसणार आहेत. इतकेच नाही, तर बऱ्याच संघांच्या सपोर्ट स्टाफमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

आता नुक्त्याच आलेल्या नव्या रिपोर्ट्सनुसार आशिष नेहरा आणि विक्रम सोळंकी हे गुजरात टायटन्स संघाची साथ सोडण्याची शक्यता आहे. नेहरा सध्या या संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे, तर विक्रम सोळंकी क्रिकेट संचालक आहेत.

हे दोघेही गुजरातबरोबर २०२२ हंगामापासून जोडलेले आहेत. त्यांनी त्यांच्या पहिल्याच हंगामात २०२२ साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर २०२३ मध्येही अंतिम सामना गाठला होता. पण २०२४ मध्ये संघाला प्लेऑफ गाठता आली नव्हती.

दरम्यान, रिपोर्ट्सनुसार युवराज सिंग आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये दिसू शकतो. पण अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गुजरातचे मेंटॉर राहिलेल्या गॅरी कर्स्टन यांनी आयपीएल २०२४ नंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्विकारले आहे. त्यामुळे ते देखील पुढीलवर्षी गुजरात संघासोबत नसणार आहेत.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले, 'अनेक पत्ते बदलणार आहेत. आशिष नेहरा आणि विक्रम सोळंकी सोडून जाण्याची दाट शक्यता आहे आणि युवराज सिंगबरोबर चर्चा आधीच सुरू झाली आहे. अद्याप काहीही अंतिम स्पष्ट झालेलं नाही, पण गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल होऊ शकतात.'

गुजरात टायटन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आशिष कपूर, नईम अमिन, नरेंद्र नेगी आणि मिथून मन्हास हे देखील आहेत. पण आता हे सदस्यही दुसऱ्या संघांमध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न करू शकतात.

गुजरात टायटन्स २०२२ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत गुजरातने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. तसेच २०२३ आयपीएलमध्येही हार्दिक कर्णधार असताना गुजरातने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांना पराभूत व्हावे लागले.

यानंतर आयपीएल २०२४ पूर्वी गुजरातने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सला ट्रेड केले. त्यामुळे या हंगामासाठी शुभमन गिलकडे नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली. तसेच या हंगामात मोहम्मद शमीही दुखापतीमुळे खेळू शकला नाही.

अशात हार्दिक आणि शमी या दोन महत्त्वाच्या खेळाडूंची कमी गुजरातला आयपीएल २०२४ मध्ये जाणवली. या हंगामात गुजरात ८ व्या क्रमांकावर राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT