Australia ODI and T20I Team Announced Squad : इंग्लंड आणि स्कॉटलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी-20 संघांची घोषणा करण्यात आली आहे. पॅट कमिन्सचा वनडे आणि टी-20 या दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही आणि त्याच्या जागी मिचेल मार्श कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. त्याला वगळण्यात आलेले नाही, परंतु कसोटी सामन्यांसाठी तो पूर्णपणे फ्रेश राहावा म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाला आधी स्कॉटलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. पहिला सामना 4 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 6 सप्टेंबरला आणि तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 7 सप्टेंबरला होणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 11, 13 आणि 15 सप्टेंबर रोजी टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही होणार आहे. एकदिवसीय मालिका 19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान खेळली जाईल.
ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेसाठी कूपर कॉनोलीचाही आपल्या संघात समावेश केला आहे. बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्ससाठी त्याने जबरदस्त फिनिशरची भूमिका बजावली. अशा स्थितीत त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते.
स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल या दिग्गज खेळाडूंना केवळ एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. त्याचा टी-20 संघात समावेश करण्यात आलेला नाही. टी-20 संघातील बहुतांश नवीन खेळाडूंवरही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ - मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, नॅथन एलिस, जेक फ्रेजर-मॅकगर्क, झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, आरोन हार्डी, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस.
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ - मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲलेक्स कॅरी, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशेन, शॉन ॲबॉट, नॅथन एलिस, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ॲडम शॉम्पा, मॅथ्यू शॉर्टी मिचेल स्टार्क.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.