Axar Patel | Hardik Pandya Sakal
क्रिकेट

'गुजराती टेन्शन घेत नाहीत...', T20 World Cup फायनलवेळी बॅटिंगला जाणाऱ्या अक्षरला काय म्हणालेला हार्दिक?

Axar Patel on Batting in T20 World Cup 2024 Final: टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने ३४ धावांवरच ३ विकेट्स गमावल्यानंतर फलंदाजीला जाणाऱ्या अक्षर पटेलला हार्दिक काय म्हणाला होता, जाणून घ्या.

Pranali Kodre

Axar Patel on Batting in T20 World Cup 2024 Final: भारतीय संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली. भारताने बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

भारताचे हे ११ वर्षांनंतरचे पहिले आयसीसी विजेतेपद ठरले आहे. दरम्यान, या सामन्यात अनेकदा भारत अडचणीतही सापडला होता.

या सामन्यात अखेरच्या पाच षटकात वेगवान गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी आणि सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात बाऊंड्री लाईनजवळ पकडलेला डेव्हिड मिलरचा झेल महत्त्वाचा तर ठरलेलाच, पण त्याचबरोबर फलंदाजीवेळी विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात झालेली भागीदारी खूप महत्त्वाची ठरली होती. आता याबाबतच अक्षरने भाष्य केले आहे.

अंतिम सामन्यात भारताने ३४ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांच्या विकेट्सचा समावेश होता. त्यावेळी पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल फलंदाजीला उतरला होता. त्याने विराटबरोबर ७२ धावांची भागीदारी केली होती. अक्षर ४७ धावांवर बाद झाला होता.

या भागीदारीबाबत अक्षर क्रिकबझशी बोलताना म्हणाला, "जेव्हा ऋषभ पंत बाद झाला, तेव्हा रोहित भाई माझ्या शेजारी उभा होता. त्याने मला सांगितलं की अक्षर पॅड घालून ठेव. त्यानंतर युजवेंद्र चहल माझ्याकडे धावत आला आणि सांगितलं की राहुल द्रविड भाईने सांगितलंय की पॅडअप हो."

"जेव्हा मी पॅड घालत होतो, तेव्हा मला काय करावे कळत नव्हतं. आमच्या दोन विकेट्स गेल्या होत्या, मला खेळपट्टीचा अंदाजही नव्हता. नंतर मी पाहिलं सूर्यकुमारही बाद झाला."

अक्षर पुढे म्हणाला, "गोष्टी अचानक घडत होत्या, मला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. मी जेव्हा पायऱ्या उतरत होतो, तेव्हा हार्दिक मला म्हणाला, 'गुजराती कोणतंच टेन्शन घेत नाही. फक्त चेंडू पाहा आणि मार.' ती गोष्ट माझ्या डोक्यात राहिली."

"मी सामना केलेल्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. मला नंतर आत्मविश्वास आला. मी विराट भाईशी बोललो आणि तो मला सातत्याने मार्गदर्शन करत होता. विराट म्हाणाला, 'मी आहे, जर तुला असं वाटत असेल की तू आक्रमक खेळू शकतो, तर खेळ.' हे संभाषण मला मदतगार ठरलं. बाकी तर सर्वांना माहित आहे."

दरम्यान, या सामन्यात विराटने ७६ धावांची खेळी केली. तसेच अखेरीस शिवम दुबेने १६ चेंडूत २७ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या.

त्यानंतर १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने ५२ धावांची खेळी केली होती. भारताकडून हार्दिकने ३ विकेट्स घेतल्या होत्या, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या होत्या. तसेच अक्षरने १ विकेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT