Pakistan Cricket Team Fielding Practice  esakal
क्रिकेट

Babar Azam : आधी आर्मी ट्रेनिंग आता गादीवर डाईव्हची प्रॅक्टिस... पाकिस्तान संघाचा अजब सराव

Pakistan Cricket Team : पाकिस्तानी क्रिकेट संघ आधुनिक जगातही जुनाट पद्धतीनं सराव करतोय.

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Cricket Team Fielding Practice : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला यंदाच्या टी 20 वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यांना युएसए सारख्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. टी 20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानचा संघ हा आर्मी ट्रेनिंग करत होता. षटकार मारण्यासाठी पाकिस्तानी संघाची ताकद वाढावी यासाठी हे आर्मी ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं.

या आर्मी ट्रेनिंगचं नंतर काय झालं हे आपण टी 20 वर्ल्डकपमध्ये पाहिलं. आता पाकिस्तान संघाचा अजून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर गाद्या टाकून फिल्डिंगची अन् डाईव्ह मारण्याची प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. हा पाकिस्तानी खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून संघाचा कर्णधार बाबर आझम आहे.

अमेरिकेत अनेक दिवस वास्तव्य केल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पाकिस्तानात परतला आहे. मायदेशात परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सराव केला. यावेळी त्याने मैदानावर गाद्या टाकून डाईव्ह मारण्याचा सराव केला. मात्र यानंतर त्याच्यावर टीका होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT