Babar Azam pick AB De Villiers best batter  sakal
क्रिकेट

ना रोहित, ना विराट! बाबर आझमने सर्वोत्तम फलंदाज म्हणून केलेली निवड ऐकून डिव्हिलियर्स चकित

Swadesh Ghanekar

Babar Azam AB De Villiers : पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स याला त्याच्या कारकीर्दित खेळलेला सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवडले आहे. बाबरने अलीकडेच डीव्हिलियर्सच्या यूट्यूब चॅनेलवर एक मुलाखत दिली आणि जेव्हा एबीने त्याला सर्वोत्तम फलंदाज निवडण्यास सांगितले तेव्हा त्याने एबी डिव्हिलियर्सचेच नाव घेतले. या उत्तराने डिव्हिलियर्स चकित झाला आणि त्याने बाबरला त्याच्या व्यतिरिक्त कोणाची तरी निवड करण्यास सांगितले. तरीही पाकिस्तानच्या कर्णधाराने, त्याचे उत्तर एबी डिव्हिलियर्सच असेल हे स्पष्ट केले.

या मुलाखतीत बाबरने कारकीर्दितील सर्वात आव्हानात्मक गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची निवड केली. बाबर आणि एबी यांच्यात यावेळी मजेशीर किस्सेही घडले. एबीने बाबरला त्याच्या फोनबुकमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तीचं नाव विचारलं आणि तो लगेच म्हणाला माझं नाव नको घेऊ... त्यावर दोघंही हसले आणि बाबरने प्रसिद्ध पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हे उत्तर दिले.

यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) कॅनडातील ग्लोबल ट्वेंटी-२० लीगसाठी शाहीन शाह आफ्रिदी, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. नसीम शाहला दी हंड्रेडमध्ये सहभाग घेण्यास नकार दिल्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला. खेळाडू आणि निवड समितीशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पीसीबीने स्पष्ट केले.

“पीसीबीला बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी या इतर खेळाडूंसह ग्लोबल ट्वेंटी-२० स्पर्धेसाठी NOC साठी विनंत्या मिळाल्या होत्या. ऑगस्ट २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील पाकिस्तान क्रिकेट संघाला सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आहे. ज्यामध्ये नऊ ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ यांचा समावेश आहे. त्यामुळेच खेळाडूंची विनंती नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असे पीसीबीने निवेदनात म्हटले.

“ते तिघे सर्व प्रकारच्या क्रिकेट संघाचे सदस्य आहेत आणि आगामी आठ महिन्यांत त्यांचे राष्ट्रीय संघाकडून खेळणे महत्त्वाचे आहे. या दरम्यान पाकिस्तान नऊ कसोटी, १४ वन डे व ९ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT