Babar Azam Post on Kamran Ghulam Sakal
क्रिकेट

PAK vs ENG: ज्या गुलामने कसोटी संघातील जागा घेतली, त्यानं शतक ठोकताच Babar Azam ची काय होती रिऍक्शन?

Babar Azam react on Kamran Ghulam Century: इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तान संघाकडून बाबर आझमच्या जागेवर कामरान गुलामला संधी मिळाली. त्याने या सामन्यात शतकही ठोकले. त्यावर बाबरने प्रतिक्रियाही दिली आहे.

Pranali Kodre

Pakistan vs England 2nd Test: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मुलतानला सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२३.३ षटकात सर्वबाद ३६६ धावा ठोकल्या.

विशेष म्हणजे या सामन्यातून पदार्पण केलेल्या कामरान गुलामने पहिल्याच दिवशी शतक ठोकत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट निवड समितीने बाबर आझम, शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाह या खेळाडूंना कसोटी संघातून बाहेर केलं आहे.

त्यामुळे बाबर आझमच्या जागेवर पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्य गुलामला जागा मिळाली. गुलामनेही बाबरच्या जागेवर खेळताना खणखणीत शतकी खेळी केली. यानंतर त्याच्या खेळावर बाबर आझमनेही कमेंट केली आहे.

२९ वर्षीय कामरान गुलाम पाकिस्तानची अवस्था १९ धावांवर २ विकेट्स अशी असाताना फलंदाजीला आला आणि त्याने सईम आयुबरोबर १४९ धावांची शतकी भागीदारी केली. गुलामने २२४ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ११८ धावांची खेळी केली.

त्याच्या या खेळीने पहिला दिवस गाजवलेला असतानाच बाबर आझमने केलल्या सोशल मिडिया पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. बाबरने इंस्टाग्राम स्टोरीवर गुलामचा फोटो शेअर करत लिहिले, 'खूप चांगला खेळला कामरान.'

Babar Azam Post

दरम्यान, पाकिस्तानकडून कामरान व्यतिरिक्त सईम आयुबनेही १६० चेंडूत ७७ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार मारले.

तसेच मोहम्मद रिझवानने ४१ धावांची खेळी केली, तर आमीर जमालने ३७ धावा केल्या, तर नोमन अलीने ३२ आणि आगा सलमानने ३१ धावांची खेळी केली. यांच्याव्यतिरिक्त कोणीही दोन आकडी धावसंख्या पार करू शकले नाहीत.

इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच ब्रायडन कार्सने ३ विकेट्स घेतल्या, तर मॅथ्यू पॉट्सने २ विकेट्स घेतल्या. शोएब बशीरने १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT