Bajrang Punia | Vinesh Phogat Sakal
क्रिकेट

Vinesh Phogat Retirement : 'तू हरली नाही तुला हरवलं...' विनेश फोगाटने निवृत्ती घेतल्यानंतर बजरंग पुनियाच्या ट्विटनं खळबळ

Kiran Mahanavar

Paris Olympics 2024 : भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमधून बाहेर जावे लागले. विनेशने महिला विभागातील ५० किलो वजनी गटात मंगळवारी मध्यरात्री अंतिम फेरीत प्रवेश करुन देदीप्यमान कामगिरी केली. बुधवारी पहाटे मात्र ती अपात्र ठरली.

काही तासांच्या अंतरात ही घटना घडली. एकीकडे सुवर्णपदकाच्या लढतीपर्यंत पोहचून भारतीय कुस्तीप्रेमींचे हृदय जिंकणाऱ्या विनेश हिला दुसरीकडे मात्र ऐतिहासिक पदकाची हुलकावणी मिळाली.

त्यानंतर भारताची स्टार रेसलर विनेश फोगाट हिने कुस्तीला अलविदा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर आणि त्यानंतर स्पर्धेतून अपात्र ठरल्यानंतर विनेशने हा मोठा निर्णय घेतला आहे. आता त्याचा सहकारी आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाने त्याच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

विनेशच्या निवृत्तीवर ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने त्याच्या X पोस्टमध्ये लिहिले, विनेश, तू हरली नाही तुला हरवलं, तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील, तू भारताची कन्या आहेस तसेच भारताचा अभिमान आहेस.

एका दिवसात तीन किलो वजन वाढले

विनेश फोगाट हिचे मंगळवारी पहाटे ४९.९ किलो वजन होते. या दिवशी तिला तीन लढती खेळावयाच्या होत्या. त्यामुळे थोडीफार न्याहारी तिने केली. यानंतर ती दिवसभरात तीन लढती खेळली. उपांत्य फेरीनंतर तिचे वजन ५२.७ किलो इतके झाले. वजन कमी करण्यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण १०० ग्रॅम अधिक वजन भरल्याने तिच्या पदक जिंकण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला.

अंतिम फेरी ते अपात्रपर्यंतच्या घटना

- विनेश फोगाट हिने मंगळवारी उपांत्य फेरीत क्युबाच्या युसनेलिस गुजमान हिच्यावर विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
- उपांत्य फेरीची लढत संपल्यानंतर विनेश हिचे वजन निर्धारित वजनी गटापेक्षा २.७ किलो अधिक होते.
- वजन कमी करण्यासाठी विनेश हिच्याकडे १२ तासांचाच अवधी होता.
- या बारा तासांमध्ये व्यायाम, केस कापणे, स्टीम या बाबी करण्यात आल्या. तरीही १०० ग्रॅम वजन अधिक राहिले
- बुधवारी पहाटे वजन केल्यानंतर विनेशला अपात्र ठरवण्यात आले.
- अपात्र ठरल्यानंतर कमकुवत होऊ नये म्हणून विनेशला खायला - प्यायला देण्यात आले.
- खबरदारी म्हणून रक्तचाचणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT