Bangladesh vs India 1st T20 News Marathi sakal
क्रिकेट

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Kiran Mahanavar

Bangladesh vs India 1st T20 : रेणूका सिंग, पूजा वस्त्रकार यांच्यासह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेश महिला संघावर ४४ धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १८ धावांत तीन फलंदाज बाद करणारी रेणूका सिंग ही सामन्याची मानकरी ठरली.

भारताकडून मिळालेल्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशच्या संघाला २० षटकांत आठ बाद १०१ धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार निगार सुल्ताना हिने ४८ चेंडूंमध्ये पाच चौकार व एक षटकाराच्या साहाय्याने ५१ धावांची खेळी साकारली; पण इतर फलंदाजांच्या अपयशामुळे बांगलादेशला विजयापासून दूरच राहावे लागले. रेणूका सिंग हिने १८ धावांमध्ये दिलारा अख्तेर, शोभना मोस्तरी व राबेया खान यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पूजा वस्त्रकार हिने २५ धावा देत दोन फलंदाज बाद केले. तसेच श्रेयांका पाटील, दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

दरम्यान, याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही; पण प्रत्येकाने छोट्या महत्त्वाच्या खेळी केल्या. स्मृती मानधना हिला नऊ धावाच करता आल्या. त्यानंतर शेफाली वर्माने ३१ धावांची, यास्तिका भाटीयाने ३६ धावांची, कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० धावांची आणि रिचा घोषने २३ धावांची खेळी केली. भारतीय संघाने २० षटकांत सात बाद १४५ धावा फटकावल्या. बांगलादेशकडून राबेया खानने २३ धावा देत तीन फलंदाज बाद केले.

दुसरा सामना मंगळवारी

भारत - बांगलादेश यांच्यामधील टी-२० मालिकेचा दुसरा सामना येत्या मंगळवारी, ३० एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन सामने २ मे, ६ मे व ९ मे रोजी होतील.

संक्षिप्त धावफलक : भारत - २० षटकांत ७ बाद १४५ धावा (शेफाली वर्मा ३१, यास्तिका भाटीया ३६, हरमनप्रीत कौर ३०, रिचा घोष २३, राबेया खान ३/२३, मारुफा अख्तेर २/१३) विजयी वि. बांगलादेश २० षटकांत ८ बाद १०१ धावा (निगाल सुल्ताना ५१, रेणूका सिंग ३/१८, पूजा वस्त्रकार २/२५). वुमन ऑफ दी मॅच - रेणूका सिंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT