Mahmudullah - Shakib Al Hasan Sakal
क्रिकेट

बांगलादेश संघातून Out Going सुरूच... आणखी एका दिग्गजाची IND vs BAN मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा

Mahmudullah announced T20I Retirement: बांगलादेशच्या स्टार अष्टपैलू क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताविरुद्धची चालू टी२० मालिका त्याची कारकिर्दीतील अखेरची मालिका असेल.

Pranali Kodre

Mahmudullah T20I Retirement: भारत विरुद्ध बांगलादेश संघात सध्या टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ३ विकेट्सने सहज विजय मिळवला. आता बुधवारी या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे, तर १२ ऑक्टोबर रोजी ही मालिका संपणार आहे.

दरम्यान, ही मालिका बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू महमुद्दुलाहची अखेरची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ठरणार आहे. महमुद्दुलाहने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

निवृत्तीबाबत महमुद्दुलाह म्हणाला, त्याने निवृत्तीचा विचार मालिकेपूर्वीच केला होता. याबाबत त्याने कर्णधार आणि प्रशिक्षकांशीही चर्चा केली होती. तसेच मी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनाही कल्पाना दिली होती. या प्रकारातून लांब होण्याची आणि फक्त वनडेवर लक्ष केंद्रीत करण्याची हीच योग्य वेळ आहे.

तसेच त्याने टी२० वर्ल्ड कप २०१६ मध्ये भारताविरूद्धचा अवघ्या १ धावेने झालेला पराभव सर्वाधिक त्रासदायक होता असंही म्हटलं. तसेच २०१८ निदाहास ट्रॉफीमध्ये त्याचा आवडता क्षण होता असं त्याने म्हटले आहे.

निदाहास ट्रॉफीमध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध १८ चेंडूत ४३ धावांची महत्त्वाची खेळी केली होती, ज्यामुळे बांगलादेशला अंतिम सामन्यात पोहचला आले होते. पण अंतिम सामन्यात त्यांना भारताविरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं.

खरंतर शाकिब अल हसनप्रमाणेच महमुद्दुलाह देखील टी२० वर्ल्ड कप २०२४ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी चर्ता होती. मात्र, त्याचा भारताविरूद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आल्याने या चर्चांना पूर्णविराम लागला होता. पण आता महमुद्दुलाहने टी२० निवृत्तीची घोषणा केली आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीही बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने महमुद्दुलाहच्या आंतरराष्ट्रीय टी२० निवृत्तीचे संकेत दिले होते. त्याने म्हटले होते की महमुद्दुलाहसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. तो कदाचीत निवड समितीशीही चर्चा करेल.

आता महमुद्दुलाहने निवृत्ती जाहीर केली असल्याने हैदराबादमध्ये १२ ऑक्टोबर रोजी होणारा टी२० सामना त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना ठरेल. त्याने यापूर्वीच २०२१ मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसेल.

३८ वर्षीय महमुद्दुलाहने १३९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून २३.४८ च्या सरासरीने २३९५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ४० विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT