Team India | IND vs BAN 1st T20I Sakal
क्रिकेट

IND vs BAN: भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्ह्युवमध्ये अडकले बांगलादेशी फलंदाज! सूर्याच्या शिलेदारांसमोर १२८ धावांचे लक्ष्य

Pranali Kodre

India vs Bangladesh, 1st T20I Match: भारताविरुद्ध रविवारी ग्वाल्हेरला होत असलेल्या पहिल्या टी२० सामन्यात बांगलादेशच्या संघाने १९.५ षटकात सर्वबाद १२७ धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी १२८ धावांचे आव्हान आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशकडून परवेझ हुसैन इमॉन आणि लिटन दास यांनी डावाची सुरुवात केली. पण त्यांना फार वेळ खेळट्टीवर टिकता आले नाही.

अर्शदीपने या दोघांनाही स्वस्तात बाद केलं. अर्शदीपने रिंकु सिंगच्या हातून आधी लिटन दास ४ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर तिसर्‍या षटकात अर्शदीपने परवेझला ८ धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर कर्णधार नजमुल हुसैन शांतोने तौहिद हृदोयच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच वरुण चक्रवर्तीने तौहिद हृदोयला १२ धावांवर हार्दिक पांड्याच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर लगेचच महमुद्दलाला मयंक यादवने १ धावंवरच बाद करत पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली.

त्यानंतर पाचवा धक्का वरुण चक्रवर्तीने जाकर अलीला त्रिफळाचीत करून दिला. त्याने ८ धावा केल्या. लगेचच कर्णधार नजमुल हुसैन शांतोची झुंज वॉशिंग्टन सुंदरने त्याच्याच गोलंदाजीवर झेल घेत संपवली. रिशाद हुसैनलाही वरुण चक्रवर्तीने ११ धावांवर बाद केले, तर तस्किन अहमदला अर्शदीप आणि हार्दिक पांड्याने मिळून १२ धावांवर धावबाद केले.

एकीकडून विकेट्स जात असताना मेहदी हसन मिराज दुसऱ्या बाजूने झुंज देत होता. मात्र १८ व्या षटकात शोरुफुल इस्लामला हार्दिक पांड्याने शुन्यावर बाद केले, तर मुस्तफिजूरला अर्शदीपने १ धावंवर बाद करत बांगलादेशचा डाव संपवला. मेहदी हसन मिराज ३५ धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT