Bangladesh Fielders dropped Catch Sakal
क्रिकेट

BAN vs SL, Test: गोंधळात गोंधळा! एक कॅच घेण्यासाठी तीन फिल्डरचा प्रयत्न अन् तरी फलंदाज नॉटआऊट, पाहा Video

Bangladesh Fielders dropped Catch: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एक झेल घेण्यासाठी बांगलादेशच्या तीन क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले, पण तरी त्यांना झेल घेण्यात अपयश आले.

Pranali Kodre

Bangladesh Fielders dropped Catch: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना 30 एप्रिलपासून चितगावला सुरू झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (31 मार्च) बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांकडून एक गमतीशीर चूक झाली.

या सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली. दरम्यान, श्रीलंकेच्या पहिल्या डावात 6 बाद 419 धावा झालेल्या असताना 121 व्या षटकात श्रीलंकेचा फलंदाज प्रभात जयसुर्या खलीद अहमदच्या गोलंदाजीचा सामना करत होता. यावेळी खलीदने टाकलेला चेंडू प्रभातच्या बॅटची कड घेत मागे गेला.

यावेळी पहिल्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या कर्णधार नजमुल हुसेन शान्तोकडून झेल सुटला आणि हवेत उडाला. यावेळी स्लीपलाच क्षेत्ररक्षण करत असलेल्या शहादत हुसेन दिपूने झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यालाही त्यात अपयश आले.

त्यानंतर झाकिर हसननेही झेलसाठी डाईव्ह मारली, परंतु त्याच्याही हातात चेंडू आला नाही. अखेर प्रभातला जीवदान मिळाले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांना ही घटना गमतीशीर भासली आहे. प्रभातने नंतर 28 धावा केल्या.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बांगलादेशने पहिल्या डावात 159 षटकात सर्वबाद 531 धावा केल्या. बांगलादेशकडून कुशल मेंडिसने सर्वाधिक 93 धावा केल्या, तर कामिंदू मेंडिसने 92 धावांची खेळी केली.

तसेच दिमुथ करुणारत्ने (86), निशान मदुशका (57), दिनेश चंडिमल (59) आणि धनंजय डी सिल्वा (70) यांनीही अर्धशतके केली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. हसन मेहमुदने 2 विकेट्स घेतल्या, तर खलीद अहमद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रथम 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT