Mumbai vs Baroda: देशांतर्गत क्रिकेटमध्ये तब्बल २६ वर्षांनी बडोदा संघाला मुंबईला पराभूत करण्यात यश आले आहे. रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेमधील पहिल्या सामन्यात बडोद्याने मुंबईवर विजय मिळला. गतविजेत्या मुंबई संघाला ८४ धावांनी पराभूत केल्यानंतर कर्णधार कृणाल पांड्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आनंदोत्सव साजरा केला आहे. कृणाल पांड्याच्या या इंस्टाग्राम पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
बडोदा संघासोबत फोटो पोस्ट करत कृणाल पांड्या म्हणाला, "गेली सव्वीस वर्ष आम्ही मुंबईविरूद्धच्या विजयाची वाट पाहत होतो आणि आज तो मिळाला. या संघाचा सार्थ अभिमान आहे. घेतलेल्या सर्व मेहनतीचे आणि प्रयत्नांचे सार्थक झाले. "
पहिल्या डावात बडोद्याच्या २९० धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईचा डाव २१४ धावांवर आटपला आणि बडोद्याने सामन्यात ७६ धावांची आघाडी घेतली. बडोद्याचा दुसरा डाव मुंबईने १८५ धावांवर गुंडाळला आणि सामन्यात पुनरागम केले. या १८५ धावांमध्ये कर्णधार कृणाल पांड्याच्या ५५ धावांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या डावात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनने ५ विकेट्स घेतल्या.
मुंबईला जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात २६२ धावांची खेळी करण्याची आवश्यकता होती. मुंबईने तिसऱ्या दिवसाअंती २ विकेट्स गमावत ४२ धावा धावफलकावर लावल्या. मुंबईला शेवटच्या दिवशी २२० धावांची आवश्यकता होती. पण, मुंबईच्या फलंदाजांना संधीचे साने करता आले नाही. एकट्या सिद्धेश लाडने सामन्यात ५९ धावांची खेळी केली. सिद्धेश व्यतिरिक्त मुंबईच्या एकाही फलंदाजाला पन्नासहून अधिक धावा करता आल्या नाहीत. बडोद्याच्या भार्गव भट्टने मुंबईच्या निम्म्या संघाला तंबूत परतवले. त्यामुळे मुंबईचा डाव अवघ्या १७७ धावांवर आटपला आणि बडोद्या सामन्यात ८४ धावांनी बाजी मारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.