IND vs NZ Womens ODI: भारतीय संघ महिला ट्वेंटी-२० संघ वर्ल्ड कपनंतर न्युझीलंडविरूद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यंची वन-डे मालिका खेळणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले असून मालिकेतील तीन्ही सामने नरेंद्र मोदी स्टेडीयम अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ संध्या महिला ट्वेंटी-२० मध्ये खेळत असून भारताने काल झालेला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना गमवला. भारतीय संघाने ४ साखळी सामन्यांमधील २ सामने जिंकले व क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. तरीही भारताचे उपांत्य फेरीचे समीकरण इतर संघांच्या सामन्यांवर अवलंबून आहे.
१) २४ ऑक्टोबर २०२४ (गुरुवार) - दुपारी १.३० वाजता , नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
२) २७ ऑक्टोबर २०२४ (रविवार) - दुपारी १.३० वाजता , नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
३) २९ ऑक्टोबर २०२४ (मंगळवार) - दुपारी १.३० वाजता , नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
भारतीय पुरूष संघ १६ ओक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान न्युझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघ देखील न्युझीलंडविरूद्ध २४ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे.
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमवल्यामुळे उपांत्य फेरीमध्ये पोहचण्याचे गणित थोडे अवघड झाले आहे. पण, भारताला अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया संघ २.२२३ नेट रनरेटसह उपांत्य फेरीमध्ये पोहचला आहे. तर, भारतीय संघ ०.३२२ नेट रनरेटसह क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे जर ०.४८८ नेट रनरेट असणाऱ्या पाकिस्तान संघाने ०.२८२ नेट रनरेट असणाऱ्या न्युझीलंड संघाला पराभूत केले. तर, भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.