IPL 2025 Auction BCCI Meeting sakal
क्रिकेट

रोहित शर्मा ते ऋषभ पंत! IPL 2025 Auction पूर्वी हे ५ खेळाडू फ्रँचायझींना करू शकतात 'टाटा बाय-बाय'

Swadesh Ghanekar

Indian Premier League (IPL) 2025 auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ त्या तयारीला वेग पकडणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) त्यासाठी आज सर्व फ्रँचायझी मालकांना मुंबईत बोलवले आहे. सायंकाळी पार पडणाऱ्या या बैठकीत रिटेशन खेळाडूंची संख्या, RTM खेळाडूची संघ्या, इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबतचा निर्णय आणि फ्रँचायझींची पर्स किंमत वाढवण्यावर चर्चा होणार आहे. २०२५च्या आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होणार असल्याने प्रत्येक फ्रँचायझीमध्ये बरेच बदल पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

IPL 2025 चे काही महत्त्वाचे अपडेट्स

  • प्रत्येक फ्रँचायझीना किमान ५ ते ६ खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली जाऊ शकते

  • या रिटेन खेळाडूंमध्ये फ्रँचायझींसाठी अनकॅप्ड् खेळाडूला संघात कायम राखता येऊ शकते

  • रोहित शर्मा, विराट कोहली यांचा विरोध असलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम कायम राहू शकतो

  • प्रत्येक संघाला RTM अर्थात राईट टू मॅच नियमानुसार एका खेळाडूला घेता येईल

  • फ्रँचायझींच्या सॅलरी पर्सची रक्कम वाढवण्यात येऊ शकते आणि दर ५ वर्षांनी मेगा ऑक्शन होण्यास परवानगी

पाच खेळाडू करतील फ्रँचायझीला टाटा बाय बाय

रोहित शर्मा

  • रोहित शर्माने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये स्वतःची एक लेगसी निर्माण केली आहे. मुंबई इंडियन्सला त्याने ५ जेतेपद जिंकून दिले आहेत. आयपीएल २०२४ च्या पर्वात मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेतले आणि कर्णधारपद दिले. त्यानंतर रोहित व फ्रँचायझी यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या. KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी रोहित व अभिषेक नायर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात रोहित नाराजी व्यक्त करताना दिसला. त्यामुळे तो MI ची साथ सोडू शकतो.

लोकेश राहुल

आयपीएल २०२४ लखनौ सुपर जायंट्सला साजेशी कामगिरी करता आली नव्हती आणि फ्रँचायझी मालक संजीव गोएंका व कर्णधार लोकेश राहुल यांच्यात खटके उडाल्याचे सर्वांनी पाहिले. त्यामुळे तो ही फ्रँचायझी सोडू शकतो. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात पुन्हा दाखल होऊ शकतो.

ऋषच पंत

दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतची साथ सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या यंदा निवृत्ती घेण्याची चर्चा असताना ऋषभ चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात जाईल असे म्हटले जात आहे.

ग्लेन मॅक्सवेल व भुवनेश्वर कुमार हे अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु व सनरायझर्स हैदराबादची साथ सोडू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT