bcci secretary jay shah marathi news sakal
क्रिकेट

BCCI ची खेळाडूंना शेवटची वॉर्निंग! रणजी ट्रॉफी खेळली नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम

Kiran Mahanavar

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याने स्वतःच्या इच्छेने क्रिकेटमधून ब्रेक घेतला. यानंतर त्याने बीसीसीआय, संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि आपल्या घरच्या रणजी संघाला कोणतीही अपडेट दिली नाही. इशानचा प्लॅन काय आहे हे कोणालाच माहीत नाही. घरच्या संघाकडून तो रणजी करंडकही खेळला नव्हता. इशानच्या या वृत्तीने बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन चांगलेच संतापलेले दिसत आहे.

पुन्हा एकदा जय शहा यांनी सर्व खेळाडूंना पत्र लिहून स्पष्ट केले आहे की, देशांतर्गत क्रिकेट हे बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर एखाद्या खेळाडूने आयपीएलला प्राधान्य दिले आणि देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केले तर ते त्याच्यासाठी चांगले होणार नाही. याचे परिणाम वाईट होतील.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी करारनामा पत्र लिहून देशांतर्गत क्रिकेट न खेळणाऱ्या भारत अ संघाच्या खेळाडूंना ताकीद दिली आहे. राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट हा महत्त्वाचा निकष बनला असून त्यात सहभागी न झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा जयशहा यांनी सर्वोच्च क्रिकेटपटूंना पत्र लिहून दिला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आजकाल काही खेळाडू घरगुती रेड-बॉल क्रिकेटला कमी आणि आयपीएलला जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत. त्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. यामुळेच जय शहा यांना पत्र लिहावे लागले. त्यांनी पत्रात लिहिले की, 'अलीकडे एक ट्रेंड समोर आला आहे, जो चिंतेचा विषय आहे. काही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.

जय शहा म्हणाले, 'हा बदल अपेक्षित नव्हता. भारतीय क्रिकेट हे देशांतर्गत क्रिकेटच्या पायावर उभे आहे आणि त्याला कधीही कमी महत्त्व दिले गेले नाही. भारतीय क्रिकेटबद्दलची आमची दृष्टी पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. भारताकडून खेळू इच्छिणाऱ्या प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल. टीम इंडियात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी महत्त्वाची असते. देशांतर्गत क्रिकेट न खेळण्याचे गंभीर परिणाम होतील.

जय शहाचा इशारा थेट इशानसाठी मानला जात आहे, कारण त्याने भारतीय संघातून ब्रेक घेतला आहे. आणि तो रणजीमध्ये दिसला नाही. तो झारखंडकडून खेळतो. इशानशिवाय वेगवान गोलंदाज दीपक चहरही रणजी खेळला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT