T20 WC 2024 Team India Squad  esakal
क्रिकेट

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

अनिरुद्ध संकपाळ

T20 WC 2024 Team India Squad : आयसीसीने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप 2024 साठी आपला संघ घोषित करण्याची शेवटची तारीख 1 मे ठेवली आहे. अनेक देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे तर काही देश आज आपला संघ घोषित करतील. बीसीसीआयने देखील आपल्या संघाची घोषणा 30 एप्रिललाच केली होती. संघाच्या घोषणेनंतर योग्यता असूनही अनेक खेळाडूंना संधी मिळाली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, बीसीसीआयला आपल्या निवडलेल्या संघात अजूनही बदल करता येतो. आयसीसीच्या खास नियमानुसार हा बदल करता येतो. संघात बदल करण्याची मुदत ही 25 मे पर्यंत असेल. नियमानुसार हा बदल करण्यासाठी आयसीसीची परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र 25 मे नंतर जर संघात बदल करायचा असेल तर त्यासाठी आयसीसीची परवानगी आवश्यक आहे.

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रविंद्र जेडजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

स्टँड बाय खेळाडू : रिंकू सिंह, शुभमन गिल, शलील अहमद, आवेश खान

टी 20 वर्ल्डकप 2024 चे ग्रुप आणि संघ

ग्रुप A -

भारत, पाकिस्तान, आयरलँड, कॅनाडा, यूएसए

ग्रुप B -

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलँड, ओमान

ग्रुप C -

न्यूजीलँड, वेस्टइंडीज, अफगानिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

ग्रुप D -

दक्षिण आफ्रीका, श्रीलंका, बांग्लादेश, नेदरलँड, नेपाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT