Ben Duckett Century India Vs England : इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत आपल्या बॅझबॉलची झलक दाखवत 445 धावा करणाऱ्या भारताला धडकी भरवली आहे. इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने 2 बाद 207 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या 204 धावा फक्त 210 चेंडूत ठोकण्यात आल्या आहेत. इंग्लंड अजूनही 238 धावांनी पिछाडीवर आहे.
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने तुफानी शतकी खेळी केली. तो दिवसअखेर 133 धावांवर नाबाद होता. तर ओली पोपने 39 धावांचे योगदान दिलं. दिवसचा खेळ संपला त्यावेळी जो रूट 9 धावा करून नाबाद होता.
भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्यानंतर इंग्लंडने देखील आपला पहिला डाव आक्रमकपणे सुरू केला. सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्राऊली यांनी 89 धावांची सलामी दिली. त्यात अर्धशतक ठोकणाऱ्या डकेटचे मोठे योगदान होते.
इंग्लंडने जवळपास 6 च्या धावगतीने धावा करत आपल्या पहिल्या डावाची सुरूवात केली होती. त्यानंतर अश्विनने क्राऊलीला 8 धावांवर बाद करत आपला 500 वा बळी मिळवला. याचबरोबर इंग्लंडला पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर ओली पोप आणि बेन डकेटने इंग्लंडचा डाव पुढे नेला.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचली. बेन डकेटने 88 चेंडूत 100 धावा ठोकतल्या. अखेर मोहम्मद सिराजने 39 धावा करणाऱ्या पोपला बाद करत ही जोडी फोडली. मात्र बेन डकेट दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिला. त्याने 133 धावा केल्या तर जो रूट 9 धावा करून नाबाद होता.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 445 धावांवर ऑलआऊट झाला.
भारताकडून रवींद्र जडेजाने 112 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची खेळी केली. याशिवाय सरफराज खानने 62 धावांचे, ध्रुव जुरेलने 46 धावांचे आणि रविचंद्रन अश्विनने 37 धावांचे योगदान दिले.
शेवटी जसप्रीत बुमराहने 28 चेंडूत 26 धावांची खेळी केली. बुमराहने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.
तर इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय रेहान अहमदला दोन यश मिळाले. जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.