Pakistan vs England Test: इंग्लंड संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने एका डावाने दणदणीत विजय मिळवत आघाडी घेतली आहे.
आता दुसरा सामना मंगळवारपासून (१५ ऑक्टोबर) सुरू होत आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी स्टार फलंदाज बाबर आझम, वेगावन गोलंदाज शाहिन आफ्रिदी, नसीम शाह यांना पाकिस्तान संघात संधी दिलेली नाही.
याबाबत गेल्या दोन दिवसात बरीच चर्चा झाली आहे. पाकिस्तान क्रिकेटने त्यांना विश्रांती दिल्याचे कारण दिले आहे. पण त्याचबरोबर असंही म्हटलं आहे की संघनिवड करताना सध्याचा फॉर्म पाहाण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाशी काहीही देणं-घेणं नसल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने दिली आहे.
बेन स्टोक्स ऑगस्टच्या सुरुवातीपासून हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता तो पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. यासोबतच तो पुन्हा इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुराही हाती घेणार आहे.
दरम्यान, मुलतानला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी तो पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला एका पत्रकाराने विचारले की पाकिस्तान क्रिकेट संघातील बाबर आझम, शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्या अनुपस्थितीकडे तू कसा पाहातोस? त्यावर स्टोक्सने उत्तर दिलं की 'ही समस्या पाकिस्तान क्रिकेटची आहे, माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही.'
पाकिस्तान आणि इंग्लंड संघात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन घोषित झाली आहे.
पाकिस्तान: सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.