Rohit Sharma Sakal
क्रिकेट

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Vrushal Karmarkar

India Tour to Australia: टीम इंडिया पुढील महिन्यात कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतील पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. रोहितने वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयला ही माहिती दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

बांगलादेशला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडिया लवकरच न्यूझीलंडविरुद्ध ॲक्शनमध्ये दिसणार आहे. 16 ऑक्टोबरपासून ही कसोटी मालिका सुरू होणार असून यामध्ये 3 सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका फक्त भारतातच खेळली जाणार आहे आणि प्रत्येकजण त्याची वाट पाहत आहे. पण सर्वात उत्सुकता आहे ती बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेची... जिथे भारताने मागील सलग दोन ऑस्ट्रेलियन दौऱ्यांवर मालिका जिंकली आहे. यावेळी मालिकेत 4 ऐवजी 5 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. परंतु यापैकी एका सामन्यात टीम इंडियाला स्टार कॅप्टनशिवाय खेळावे लागू शकते.

भारतीय कर्णधाराने याबाबत बीसीसीआयला माहिती दिल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये तर दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर बसू शकतो. सध्या याबाबतची परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नाही.

रोहितने आपल्या परिस्थितीबद्दल बोर्डाला माहिती दिली आहे आणि म्हटले आहे की, वैयक्तिक कारणांमुळे त्याला एका कसोटीतून बाहेर बसावे लागेल. मात्र, हे वैयक्तिक प्रकरण कसोटी मालिकेपूर्वी सोडवल्यास तो पाचही कसोटी सामने खेळू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. याबाबतची परिस्थिती येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. जर रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक कसोटी सामना बाहेर राहिला तर फॉर्मात असलेला फलंदाज अभिमन्यू ईश्वरनला त्याच्या जागी म्हणून टीम इंडियामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.

शुभमन गिल आणि केएल राहुल हे सलामीला अधिक अनुभवी खेळाडू आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचा उपकर्णधार कोण असेल याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूची उपकर्णधारपदी नियुक्ती केलेली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

Pune Crime : कल्याणीनगर अपघात प्रकरण; अल्पवयीन मुलाला जामीन देणारे जेजेबीचे दोन सदस्य बडतर्फ

SCROLL FOR NEXT