fatima sana esakal
क्रिकेट

Womens T20I World Cup: पाकिस्तानला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार Fatima Sana मायदेशी परतणार

ICC womens T20I World Cup भारताविरूद्धचा सामना गमवल्यानंतर पाकिस्तान क्रमतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Captain Fatima Sana To Return To Pakistan: पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना वडिलांच्या निधनामुळे मायदेशी परतणार असल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाच्या सामना खेळू शकनार नाही. पाकिस्तान महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये निर्णायक टप्यावर असून कर्णधाराची अनुपस्थिती संघाला धोकादायक ठरू शकते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, "फातिमाच्या वडिलांचे गुरुवारी सकाळी निधन झाल्यामुळे सना पहिल्या उपलब्ध विमानाने पाकिस्तानमध्ये परतणार आहे. त्यामुळे शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ती खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात उपकर्णधार मुनीबा अली संघाचे नेतृत्व करेल."

कर्णधार फातिमा सना स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत आहे. सनाने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात ३० धावा व २ विकेट्स मिळवले. तर भारताविरूद्धच्या सामन्यात १३ धावांसह २ विकेट्स घेतले. स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरूद्धचे महत्वाचे सामने बाकी आसताना कर्णधाराने मधेच साथ सोडणे पाकिस्तान संघाला महागात पडू शकते. कारण पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागतील.

पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्धच्या पहिला सामना ३१ धावांनी जिंकला. तर, भारताविरूद्धचा सामना ६ विकेट्सने गमवला. पाकिस्तान क्रमतीलिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारताने काल श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवून नेट रनरेटमुळे क्रमतीलिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT