CEAT Cricket Rating Awards: CEAT क्रिकेट रेटिंग (CCR) पुरस्कारांच्या २६व्या पुरस्कार सोहळा मुंबईत बुधवारी पार पडला. भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्मा या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी ठरला. विराट कोहली वन डेतील सर्वोत्तम फलंदाज ठरला.
रोहित शर्मा म्हणाला की, “प्रत्येक सामन्यात घेतलेल्या मेहनतीची आणि जिद्दीची ही पावती आहे. या सन्मानासाठी मी सीएटीचा आभारी आहे आणि मैदानावर जे शक्य आहे त्याच्या सीमा पुढे ढकलण्यासाठी मी प्रेरित आहे.”
फिल सॉल्टला T20I बॅटर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आले, तर टिम साउदीने T20I बॉलर ऑफ द इयरचा किताब पटकावला. श्रेयस अय्यरला त्याच्या रणनीतिक कौशल्याची दखल घेऊन TATA IPL साठी उत्कृष्ट नेतृत्वाचा पुरस्कार मिळाला.
देशांतर्गत सर्किटवर सातत्यपूर्ण कामगिरीसाठी साई किशोरला डोमॅस्टिक क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले.
विराट कोहलीने वर्षातील सर्वोत्तम वन डे फलंदाजाचा पुरस्कार पटकावला आणि मोहम्मद शमीला वर्षातील सर्वोत्तम वन डे गोलंदाज म्हणून निवडण्यात आले.
महिला T20I इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा पुरस्कार हरमनप्रीत कौरला देण्यात आला, तर यशस्वी जयस्वाल आणि रविचंद्रन अश्विन यांना अनुक्रमे वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज आणि कसोटी गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले.
महिलांमध्ये दीप्ती शर्माला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला भारतीय गोलंदाज म्हणून निवडण्यात आले आणि स्मृती मानधना हिला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला भारतीय फलंदाजाचा किताब मिळाला.
महिला कसोटीतील सर्वात जलद द्विशतकाचा पुरस्कार शफाली वर्मा यांना देण्यात आला, तर जय शाह यांना खेळातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल क्रीडा प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रिकेट जगतातील गौरवशाली योगदानाबद्दल राहुल द्रविडला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.