Ind vs Eng Test sakal
क्रिकेट

Ind vs Eng Test : ३ बाद ३३ वरून डाव सावरला ; रोहित शर्मा, रवींद्र जडेजाची शतके

उत्तम खेळपट्टी, त्यात प्रथम फलंदाजीची संधी, तरीही ३ बाद ३३ अशी घसरगुंडी...या अवस्थेनंतर रोहित शर्मा (१३१) आणि रवींद्र जडेजा (नाबाद १००) यांनी द्विशतकी भागीदारी करून डाव सावरला.

सकाळ वृत्तसेवा

राजकोट : उत्तम खेळपट्टी, त्यात प्रथम फलंदाजीची संधी, तरीही ३ बाद ३३ अशी घसरगुंडी...या अवस्थेनंतर रोहित शर्मा (१३१) आणि रवींद्र जडेजा (नाबाद १००) यांनी द्विशतकी भागीदारी करून डाव सावरला. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताने ५ बाद ३२६ अशी समाधानकारक सुरुवात केली.

मुंबईचा सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल असे मधल्या फळीचे दोन खेळाडू पदार्पण करत असताना सुरुवातीच्या फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण दुसऱ्या सामन्यातील द्विशतकवीर यशस्वी जयस्वाल १० तर याच सामन्यात शतक करणारा शुभमन गिल आणि पाठोपाठी पाटीदार बाद झाल्यामुळे भारताची ३ बाद ३३ अशी घसरगुंडी उडाली होती. त्यानंतर रोहित शर्मा आणि पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेला रवींद्र जडेजा यांनी खेळपट्टीचा ताजेपणा नाहीसा होईपर्यंत संयम दाखवला आणि नंतर गोलंदाजांवर हुकूमत गाजवत द्विशतकी भागीदारी रचली.

वरकरणी खेळपट्टीचा स्वभाव बघता नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम फलंदाजी करणार हे उघड होते. सलग दुसऱ्‍या वेळेला नशिबाची साथ रोहित शर्माला मिळाली. भारतीय संघात अपेक्षेप्रमाणे चार बदल झाले. सिराज मुकेश कुमारच्या जागी परतला. जडेजा संघात आला तसेच सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेलला मानाची कसोटी कॅप मिळाली. खेळपट्टीच्या ताजेपणाचा मार्क वुडने फायदा घेत चांगलीच वेगवान गोलंदाजी केली. अँडरसनने नेहमीप्रमाणे एकदम पकडून मारा केला. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल मार्क वुडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेलबाद झाले. हार्टलीचा एकच चेंडू टप्पा पडून एकदम थांबून आल्याने रजत पाटीदार बाद झाला.

हार्टलीच्या गोलंदाजीवर २७ धावांवर खेळणाऱ्‍या रोहित शर्माचा कठीण झेल ज्यो रूटला पकडता आला नाही. रोहितने मग जडेजासह एकदम झोकात फलंदाजी केली. एकटा अँडरसन फलंदाजांना जखडून ठेवत होता. बाकी गोलंदाज षटकात किमान एक चेंडू मारायला देत होते. जडेजा - रोहितने त्याचा फायदा घेत धावा जमा करणे चालू केले. रोहितने फिरकी गोलंदाजांना पुढे सरसावत मोठे फटके मारले. ज्याने गोलंदाजांना लय सापडणे कठीण गेले. उपाहार ते चहापानादरम्यान ९२ धावा जोडताना एकही फलंदाज बाद झाला नाही. पहिल्या सत्रात तीन फलंदाज पटापट बाद झाल्याने निर्माण झालेले भारतीय संघावरचे दडपण दूर सरले होते. रोहित शर्मा शतकाच्या उंबरठ्यावर होता, तर जडेजाने अर्धशतक पार केले होते. चहापानानंतर लगेच रोहितने ११ चौकार आणि २ षटकारांसह सुंदर शतक पूर्ण केले. अगोदरच्या सामन्यात चांगली फलंदाजी जमत असताना रोहित शर्मा २०-३० धावा करून बाद झाला होता.

संक्षिप्त धावफलक

भारत, पहिला डाव : ८६ षटकांत ५ बाद ३२६ (यशस्वी जयस्वाल १०, रोहित शर्मा १३१ - १९६ चेंडू, १४ चौकार, ३ षटकार, शुभमन गिल ०, रजत पाटीदार ५, रवींद्र जडेजा खेळत आहे ११० - २१२ चेंडू, ९ चौकार, २ षटकार, सर्फराझ खान ६२ - ६६ चेंडू, ९ चौकार, १ षटकार, जेम्स अँडरसन १९-५-५१-०, मार्क वूड १७-२-६९-३, टॉम हार्टली २३-३-८१-१, रेहान अहमद १४-०-५३-०).

राजकोटच्या मैदानावर जडेजा

(प्रथम श्रेणी सामन्यांसह)

सामने : १२. डाव : १७. धावा : १५६४. सरासरी : १४२.१८. अर्धशतके : ४. शतके : ६. सर्वोच्च : ३३१

जडेजाची भरारी

कसोटीत तीन हजार धावा आणि दोनशे विकेट मिळविणारे भारतीय...

कपिल देव

(५२४८ धावा, ४३४ विकेट)

रविचंद्रन अश्विन

(३२७१ धावा, ४९९ विकेट)

रवींद्र जडेजा

(३००३ धावा, २८० विकेट)

दत्ताजीराव गायकवाड यांचा विसर

भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे बुधवारी निधन झाले; परंतु त्याचा विसर बहुधा भारतीय संघाला पडला असावा. एरवी माजी खेळाडू दिवंगत झाले तर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खेळाडू काळी पट्टी लावून खेळत असतात. दत्ताजीराव तर माजी कर्णधार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT