Chandika Hathurusingha esakal
क्रिकेट

खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

सकाळ डिजिटल टीम

Bangladesh Cricket: बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून निलंबित करण्यात आले आहे. बांगलादेश क्रिकेट बार्डाचे अध्यक्ष फारुक अहमद यांनी ही बातमी जाहीर केली. २०२३ मध्ये भारतात झालेल्या वर्ल्ड कपदरम्यान बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कानाखाली मारल्यामुळे हथुरुसिंघाला निलंबित करण्यात आले आहे, अशी काही अहवालांद्वारे माहिती समोर येत आहे.

नुकत्याच झालेल्या भारताविरूद्धच्या मालिकेत बांगलादेशने खराब कामगिरी केली. भारताने त्यांना कसोटी व ट्वेंटी-२० दोन्ही मालिकेत व्हाईटवॉश केले. हथुरुसिंघा यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ वन-डे वर्ल्ड कप व २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने खराब प्रदर्शन केले. तर कार्यकाळ संपल्यामुळे त्याला निलंबित करण्यात येत आहे, असे बांगलादेश क्रिकेट बार्डाने स्पष्ट केले आहे.

चंडिका हथुरुसिंघा यांच्या निलंबनानंतर फिल सिमन्सला बांगलादेश संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका, यूएई, वेस्ट इंडिज आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधील सामन्यांनसाठी तो संघाचे प्रभारी प्रशिक्षक काम पाहिल.

बीसीबीचे अध्यक्ष फारुक अहमद यांनी सांगितले की,"आम्ही हथुरुसिंघाला कारणे दाखवा नोटीस देऊन आणि मुख्य प्रशिक्षक पदावरून निलंबित केले आहे. हथुसिंघाला त्याच्या कारणे दाखवा नोटीसला ४८ तासांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे व त्याचे निलंबन तात्काळ लागू होईल. त्यानंतर त्याचा बीसीबी सोबतचा करार संपेल."

दक्षिण आफ्रिका, यूएई, वेस्ट इंडिज आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही फिल सिमन्सला प्रभारी प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे," फारुक अहमद पुढे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Assembly Election: दोन वर्षांपासून गुजरात महाराष्ट्राला चालवत होता, आता जनताच न्याय करणार; मशाल धगधगणार! आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

"मामापासून लपून केलेलं वोटिंग ते बिग बॉसचा रनर अप" ; पृथ्वीक प्रतापचं अभिजीत सावंतसाठी खास पत्र ; "सुरजशी तो मायेने..."

Aditya Thackeray on Election: “दोन वर्षांपासून आम्ही वाट पाहत होतो....”; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंमध्ये दिसला उत्साह

SCROLL FOR NEXT