MS Dhoni | R Ashwin | CSK Sakal
क्रिकेट

IPL Auction 2025: CSK च्या ताफ्यात अश्विन आण्णाची होणार घरवापसी, तर 'लाला'चीही लागणार वर्णी?

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम २०२५ मध्ये खेळवला जाणार आहे. या हंगामाआधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यादृष्टीने संघांची तयारीही सुरू झाली आहे.

यादरम्यान कोणता खेळाडू कोणत्या संघात खेळू शकतो, यावर बऱ्याच चर्चा होत असून विविध रिपोर्ट्सही समोर येत आहे. आता चेन्नई सुपर किंग्स संघाबाबतही काही रिपोर्ट्स समोर आले आहेत.

आगामी आयपीएल २०२५ लिलावात चेन्नई सुपर किंग्स संघही काही खेळाडूंवर नजर ठेवून असणार आहेत. यात अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि वेगावान गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश असू शकते.

RevSportz ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार चेन्नई आगामी लिलावातून अश्विन आणि शमी यांना संघात घेऊ शकतात. अश्विन यापूर्वीही बरीच वर्षे चेन्नईकडून खेळला आहे. खरंतर त्याने आयपीएलमध्ये पदार्पणही चेन्नईकडून केले होते.

तो २००९ ते २०१५ पर्यंत चेन्नई संघाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. त्यामुळे जर त्याला लिलावातून चेन्नईने संघात घेतले, तर ही त्याची चेन्नई संघात घरवापसी असेल. सध्या अश्विन राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. जर त्यांनी त्याला लिलावापूर्वी संघातून करारमुक्त केले, तर तो लिलावात येऊ शकतो.

तसेच शमी आयपीएल २०२४ मध्ये दुखापतीमुळे खेळला नव्हता. तो गुजरात टायटन्सचा भाग आहे. त्याने त्याआधीच्या हंगामात गुजरातला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आता २०२५ मध्ये तो आयपीएलमध्ये पुनरागमन करू शकतो. आता जर गुजरातने त्याला कायम केले नाही, तर तो देखील लिलावात दिसू शकतो.

धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, एमएस धोनीने आयपीएल २०२४ पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने नेतृत्व ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवले होते. त्यामुळे धोनीने आयपीएल २०२४मध्ये अखेरचा हंगाम खेळल्याची चर्चा होती.

मात्र अद्याप धोनीने तो आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही, याबाबत कोणतेही स्पष्ट भाष्य केलेलं नाही. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ या पाच वर्षी आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT