Ajit Agarkar | Ruturaj Gaikwad Sakal
क्रिकेट

Ruturaj Gaikwad's Omission: गिल उपकर्णधार, पण ऋतुराज-सॅमसनला संधी का नाही? आगरकरने दिलं स्पष्ट उत्तर

Gautam Gambhir - Ajit Agarkar press conference: श्रीलंका दौऱ्यातून ऋतुराज गायकवाडला का संधी मिळाली नाही आणि संजू सॅमसनलाही वनडे संघात का निवडले नाही, याबाबत अजित आगरकरने स्पष्टीकरण दिले आहे.

Pranali Kodre

Ajit Agarkar on Ruturaj Gaikwad's Omission: भारतीय क्रिकेट संघ सोमवारी (२२ जुलै) श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुंबईमध्ये भारतीय संघाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत गंभीर आणि आगरकर अनेक मुद्यांवर बोलले. यावेळी त्यांनी ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांना या दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न देण्याबाबतही भाष्य केले. तसेच संजू सॅमसनलाही वनडे संघात का निवडले नाही, याबाबतही सांगितले.

श्रीलंका दौऱ्यातील टी२० आणि वनडे मालिकेसाठी जेव्हा भारतीय संघाची निवड करण्यात आली, त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

यातील महत्त्वाचे प्रश्न म्हणजे रियान परागला दोन्ही मालिकांसाठी संधी देण्यात आली, तसेच शुभमन गिललाही संधी मिळण्याबरोबरच उपकर्णधारही करण्यात आले. मात्र, असं असलं तरी ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांना चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही संधी का देण्यात आली नाही.

यावर बोलताना आगरकर म्हणाला, 'ज्या खेळाडूंना बाहेर ठेवावे लागले आहे, तो एक कठीण निर्णय होता. आमच्यासमोर केवळ १५ खेळाडूंना निवडण्याचे आव्हान होते. आम्ही संघात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणीतरी बाहेर होणार होते.'

'रिंकूकडे पाहा, त्याने टी२० वर्ल्ड कपपूर्वी खूप चांगली कामगिरी केली होती. पण तरी संघात स्थान मिळाले नव्हते. आम्ही फक्त १५ खेळाडू निवडू शकतो.'

शुभमन गिलला संधी देण्याबाबत आगकरने सांगितले, 'आम्हाला वाटते की तो तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे. त्याने गेल्या काही वर्षात त्याच्यातील चांगले गुणही दाखवले आहेत. त्यामुळे आम्हाला असा कोणीतरी हवा होता, जो वरिष्ठ खेळाडूंकडून काहीतरी शिकू शकेल.'

'सूर्या संघात आहे आणि रोहितही आहे. त्यामुळे आम्हाला दुखापत झाली किंवा फॉर्मच्या कारणाने अचानक नवा कर्णधार शोधण्याचे आव्हान असणार नाही. ही यामागील कल्पना आहे. तसेच गिलने त्याच्यातील नेतृत्व कौशल्यही दाखवले आहे. आम्हाला त्याने अनुभव घ्यावा, असे अपेक्षित आहे. आयुष्यात कोणतीच खात्री नसते, पण सध्यातरी हे असेच आहे.'

भारतीय संघाला श्रीलंकाविरुद्ध २७ ते ३० जुलैदरम्यान टी२० मालिका खेळायची आहे, तर २ ते ७ ऑगस्टदरम्यान वनडे मालिका खेळायची आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

वनडे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

टी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT