David Warner retirement sakal
क्रिकेट

David Warner : 'मला खेळायचं...', स्टार खेळाडूने निवृत्तीतून घेतला यू-टर्न? बोर्डाला केली अपील

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्तीची घोषणा केली होती.

Kiran Mahanavar

Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्या संघाला त्याची गरज असेल तेव्हा तो उपलब्ध असेल असे त्याने सांगितले होते. परंतु, आता असे दिसते आहे की तो निवृत्तीपासून यू-टर्न घेण्याचा विचार करत आहे आणि त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे हे सूचित केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो रील शेअर करून त्याच्या फॅन्सशी जोडलेला असतो. आता दरम्यान, त्याने सोमवारी त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट शेअर केली, ज्याद्वारे त्याने निवृत्तीवरून परतण्याचे संकेत दिले आहेत.

डेव्हिड वॉर्नर पोस्टमध्ये लिहिले की, "चॅप्टर संपला!! इतके दिवस सर्वोच्च स्तरावर खेळणे हा एक अविश्वसनीय अनुभव आहे. ऑस्ट्रेलिया माझा संघ होता. माझ्या कारकिर्दीतील बहुतांश काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यात घालवला आहे आणि ते करू शकलो हा सन्मान आहे. सर्व फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळणे ही माझ्या कारकिर्दीतील मोठी उपलब्धी आहे. ज्यांनी हे शक्य केले त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलींच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.

डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीनंतर यू-टर्न घेण्याचे संकेत दिले. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. त्याने पुढे लिहिले की, "आशा आहे की मी सर्व क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले आहे आणि क्रिकेट बदलले आहे, विशेषत: कसोटीमध्ये, जिथे आम्ही इतरांपेक्षा वेगाने धावा केल्या. आम्हाला जे आवडते ते आम्ही चाहत्यांशिवाय करू शकत नाही, म्हणून धन्यवाद. मी काही काळ फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन आणि माझी निवड झाल्यास मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासही तयार आहे. खेळाडू आणि कर्मचारी, मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT