RCB beat Delhi Capitals by 8 wickets to lift WPL title News in Marathi 
क्रिकेट

DC vs RCB WPL Final : RCB ने रचला इतिहास! अंतिम सामन्यात दिल्लीला पाजले पराभवाचे पाणी अन् कोरले WPL 2024 च्या ट्रॉफीवर नाव

RCB beat Delhi Capitals by 8 wickets to lift WPL title : 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.

Kiran Mahanavar

Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore WPL 2024 Final Score : 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग 2024 च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. विजेतेपदाच्या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव करत चमकदार ट्रॉफीवर कब्जा केला. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला होता. दुसरीकडे दिल्लीला सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. पहिल्या सत्रातही त्याला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील संघाने विजेतेपदाच्या सामन्यात दिल्लीला 113 धावांवर रोखले होते. जे आरसीबीने 19.3 षटकात दोन गडी गमावून पूर्ण केले. (RCB beat Delhi Capitals by 8 wickets to lift WPL title)

DC vs RCB Live Score WPL Final : कर्णधार स्मृती मानधनाची पडली विकेट! RCBला ट्रॉफी जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज

अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला दुसरा धक्का दिला. सलामीवीर सोफी डेव्हाईन बाद झाल्यानंतर कर्णधार स्मृती मानधनाही पॅव्हेलियनमध्ये परतली आहे. मंधानाने 31 धावा केल्या आणि तिचा डाव मिन्नू मणीने संपुष्टात आणला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून पण 25 चेंडूत 29 धावांची गरज आहे

DC vs RCB Live Score WPL Final : RCB ला बसला मोठा धक्का! पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज

दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला पहिला धक्का देत सलामीवीर सोफी डिव्हाईनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शिखा पांडेने डिव्हाईनला बाद केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून पण 68 चेंडूत 63 धावांची गरज आहे.

DC vs RCB Live Score WPL Final : श्रेयंका पाटिलाने मारला विकेटचा 'चौकार'! दिल्लीने RCB ला दिले 114 धावांचे लक्ष्य!

DC vs RCB Live Score WPL Final : तुफानी सुरुवात नंतर RCB ने मोडले दिल्लीचे कंबरडे! 24 धावांच्या आता बसले सात धक्के

दिल्ली कॅपिटल्सला 87 धावांवर सातवा धक्का बसला आहे. संघाला पहिला झटका 64 धावांवर बसला आणि आता 87 धावांपर्यंत मजल मारली तोपर्यंत संघाचे सात विकेट पडल्या होत्या. म्हणजेच 24 धावा करताना दिल्लीने सात विकेट गमावल्या. सध्या राधा आणि अरुंधती क्रीजवर आहेत.

DC vs RCB Live Score WPL Final : W,0,W,W... तुफानी सुरुवात नंतर RCB ने मोडले दिल्लीचे कंबरडे! संघाला बसला मोठा धक्का

वेगवान सुरुवात केल्यानंतर आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचे कंबरडे मोडले आहे. 7.4 षटकात 64 धावांवर दिल्लीने पहिली विकेट गमावली होती, परंतु यानंतर डावखुरा फिरकीपटू मोलिनेक्सने आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या शेफाली वर्माला आऊट करून दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर त्याच षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याने जेमिमा आणि कॅप्सीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या धक्क्यातून दिल्लीचा डाव सावरला असतानाच श्रेयंका पाटीलने दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगला बाद करून चौथा धक्का दिला. अशाप्रकारे दिल्लीने अवघ्या 10 धावांत चार विकेट गमावल्या आहेत.

DC vs RCB Live Score WPL Final : W,0,W,W... वादळ थांबले! RCB ने दिल्लीला एकाच षटकात दिले 3 धक्के; शफालीचे अर्धशतक हूकले...

आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार पुनरागमन करत दिल्ली संघाला एकाच षटकात तीन धक्के दिले आहे. आठवे षटक टाकण्यासाठी आलेला डावखुरा फिरकी गोलंदाज सोफी ग्रेस मोलिनेक्सने कहर केला आणि दिल्लीला धक्के दिले.

सोफी ग्रेस मोलिनेक्सने आधी फॉर्ममध्ये दिसणारी सलामीची फलंदाज शेफाली वर्माला आऊट केले आणि त्यानंतर नवीन फलंदाज म्हणून आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्जला पुढच्या चेंडूवर शुन्यावर क्लीन बोल्ड केले.

शेफाली वर्मा आणि जेमिमानंतर षटकाच्या चौथा चेंडूवर ॲलिस कॅप्सीला पॅव्हेलियनमध्ये पाठवून दिल्लीचे कंबरडे मोडले. शेफालीचे अर्धशतक हुकले, तिने 27 चेंडूत 44 धावा केल्या.

DC vs RCB Live Score WPL Final : फायनल सामन्यात पहिल्या 6 षटकात दिल्ली कॅपिटल्सचा डंका! ठोकल्या इतक्या धावा

दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्ध वेगवान सुरुवात केली आहे. कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळी करत दिल्लीला चांगल्या स्थितीत आणले आहे. सहा षटकांनंतर स्कोअर न विकेट गमावता 61 धावा आहे. सहावे षटक संपल्यानंतर शेफालीने 42 धावा आणि लॅनिंगने 17 धावा केल्या.

DC vs RCB Live Score WPL Final : दिल्ली कॅपिटल्सची तुफानी सुरुवात, दोन षटकात ठोकल्या इतक्या धावा

दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्ध वेगवान सुरुवात करून दोन षटकांत एकही बिनबाद १९ धावा केल्या. कर्णधार मेग लॅनिंग सहा चेंडूत चार धावा करत असून शेफाली वर्मा सहा चेंडूत १३ धावा करत आहे. यादरम्यान शेफालीने मोलिनक्सवर शानदार षटकार ठोकला, जो दिल्लीच्या डावातील पहिला षटकार होता.

DC vs RCB Live Score WPL Final : फायनलमध्ये बंगळुरूविरुद्ध दिल्लीने जिंकले नाणेफेक! जाणून घ्या काय घेतला निर्णय अन् Playing-11

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॅनिंगने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये श्रद्धा पोखरकरच्या जागी एस मेघनाला प्लेइंग-11 मध्ये एंट्री मिळाली आहे.

DC vs RCB Live Score WPL Final : RCB रचणार इतिहास... की दिल्ली कॅपिटल्स मारणार बाजी, थोड्याच वेळात रंगणार फायनलचा थरार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फायनल सामना खेळला जात आहे. हा अंतिम सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे खेळला जात आहे, आणि भारतीय वेळेनुसार सामना 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT