Deepti Sharma becomes 1st Indian to take a WPL hat-trick Marathi News sakal
क्रिकेट

W,W,W... दीप्ती शर्माने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू

Deepti Sharma WPL 2024 : भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Kiran Mahanavar

Deepti Sharma WPL 2024 : भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये हॅटट्रिक घेणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

दीप्ती शर्मा डब्ल्यूपीएलमध्ये यूपी वॉरियर्स संघाकडून खेळती. आणि तिने शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हा विक्रम केला. लागोपाठ तीन विकेट घेत आपल्या संघाला एका धावेने रोमहर्षक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दीप्ती शर्माने प्रथम दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगला 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. यानंतर ती थेट 19व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आली आणि सलग दोन विकेट घेत तिने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. तिने ॲनाबेल सदरलँड आणि अरुंधती रेड्डी यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दीप्ती शर्मा इथेच थांबली नाही आणि त्याच षटकात दुसरी विकेट घेतली. शिखा पांडेला बाद करून यूपी वॉरियर्सला सामन्यात आणले.

दीप्ती शर्मा WPL मध्ये हॅट्ट्रिक घेणारी दुसरी गोलंदाज

या सामन्यात दीप्ती शर्माने 4 षटकात 19 धावा देत 4 विकेट घेतल्या. यापूर्वी तिने फलंदाजीतही उत्कृष्ट योगदान दिले होते. दीप्तीने 48 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 59 धावांची खेळी केली होती. या कारणामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

दीप्ती शर्मा ही महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारी पहिली भारतीय गोलंदाज आहे. आणि या बाबतीत ती दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या आधी मुंबई इंडियन्सच्या ईसी वाँगने ही कामगिरी केली होती.

या सामन्यात यूपी वॉरियर्सने अवघ्या एका धावेने विजय मिळवला. एकेकाळी दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा सामना सहज जिंकत होता. पण त्यानंतर शेवटच्या दोन षटकात 6 विकेट्स गमावल्या आणि पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोणत्या अम्पायरला 'Stumps' एवढे मोठे दिसायचे? सचिन तेंडुलकरचा प्रश्न अन् Steve Bucknor ट्रोल, इरफान पठाणचीही प्रतिक्रिया

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

SCROLL FOR NEXT