Devdutt Padikkal is making his Test debut for India Marathi News sakal
क्रिकेट

Devdutt Padikkal Test Debut : शेवटच्या कसोटीत देवदत्त पडिक्कलचे पदार्पण! कर्णधार रोहितने संघात केले दोन मोठे बदल

Devdutt Padikkal is making his Test debut for India : भारतीय क्रिकेट संघ धरमशाला येथील HPCA स्टेडियमवर आज गुरुवारपासुन इंग्लंड विरुद्ध पाचवी आणि शेवटची कसोटी खेळणार आहे.

Kiran Mahanavar

India vs England 5th Test Devdutt Padikkal Debut : भारतीय क्रिकेट संघ धरमशाला येथील HPCA स्टेडियमवर आज गुरुवारपासुन इंग्लंड विरुद्ध पाचवी आणि शेवटची कसोटी खेळणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुढचे तीन सामने जिंकून 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली असून आता यजमानांच्या नजरा 4-1 ने संपवण्याकडे असतील.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. म्हणजेच रोहित शर्माची टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत.

आकाशदीपच्या जागी जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी रणजीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या देवदत्त पडिकलने पदार्पण केले आहे. भारताकडून कसोटी खेळणारा तो 314 वा खेळाडू ठरला आहे. रजत पाटीदारच्या जागी त्याचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा 100 वा सामना आहे. 100 कसोटी सामने खेळणारा तो 14वा भारतीय खेळाडू ठरणार आहे.

इंग्लंडने एक दिवसापूर्वी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. धरमशाला कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मार्क वुड इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे तर ऑली रॉबिन्सनला बाहेर ठेवण्यात आले आहे. फिरकीपटू शोएब बशीर आपली जागा वाचवण्यात यशस्वी ठरला आहे.

धरमशाला येथे होणारी ही कसोटी टीम इंडियाचा वरिष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. अशा स्थितीत मालिका जिंकून भारताला अश्विनची 100वी कसोटी संस्मरणीय बनवायची आहे.

सामना सुरू होण्यापूर्वी चार दिवस धरमशाला येथे अवकाळी पाऊस पडला होता आणि पहिल्या दिवशी सकाळी हिमवृष्टीचा अंदाज होता. आज हवामान स्वच्छ असले तरी. मात्र, सामन्याच्या पहिल्या दिवशी तुरळक पावसाची शक्यता आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11 -

इंग्लंड : जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (विकेटकीपर), शोएब बशीर, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.

भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT