Dhawal Kulkarni MumbaI Ranji Trophy sakal
क्रिकेट

Dhawal Kulkarni : पुढील हंगामाआधी मुंबई संघाचा मोठा निर्णय! दिग्गज खेळाडूकडे दिली 'ही' मोठी जबाबदारी

MumbaI Ranji Trophy Dhawal Kulkarni News : आगामी रणजी हंगामासाठी मुंबई संघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Kiran Mahanavar

Dhawal Kulkarni MumbaI Ranji Trophy News : आगामी रणजी हंगामासाठी मुंबई संघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या मोसमातील विजेते आणि विक्रमी ४२ वेळा ही ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाने आगामी २०२४-२५ हंगामातील सर्व फॉरमॅटमध्ये अनुभवी खेळाडू आणि माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला मार्गदर्शकाची भूमिका दिली आहे. गेल्या रणजी मोसमात मुंबईला विजय मिळवून देण्यात धवलने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने स्टॅम्प आणि कॉफीटेबल पुस्तक तयार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक यांनी दिली.

भारताचे महान फलंदाज सुनील गावसरकर वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत, त्यानिमित्ताने त्यांचाही सत्कार करण्याचा प्रस्ताव अध्यक्ष अमोल काळे यांनी मांडला आणि बैठकीत तो एकमताने मान्य करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

धवल कुलकर्णीची क्रिकेट कारकीर्द....

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या धवल कुलकर्णीच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी 12 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 19 आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धवलने 96 सामने खेळताना 27.11 च्या सरासरीने 285 बळी घेतले आहेत, तर लिस्ट-ए फॉरमॅटमध्ये 130 सामने खेळताना 22.13 च्या सरासरीने 223 विकेट्स घेतल्या आहेत. तर T20 फॉरमॅटमध्ये धवल कुलकर्णीने 162 सामने खेळले असून त्यात त्याने 27.99 च्या सरासरीने 154 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Shukla : निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

Cancer : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग घेतोय महिलांचा जीव

Ekanth Shinde: एकनाथ शिंंदे पुन्हा मुख्यमंत्री नाही झाले तर महायुतीला बसणार फटका ? वाचा महत्त्वाची बातमी

Maharashtra Winter : राज्यभरात गारठा वाढला! किमान तापमानाचा पारा घसरू लागला

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT