Rishabh Pant, MS Dhoni, Dinesh Karthik Sakal
क्रिकेट

थांबा घाई नको! Rishabh Pant च्या धोनीबरोबरील तुलनेबाबत दिनेश कार्तिकने स्पष्टच बोलला

Dinesh Karthik on comparison between MS Dhoni and Rishabh Pant: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक करत धोनीच्या ६ कसोटी शतकांची बरोबरी केली. यानंतर ऋषभ पंत आणि एमएस धोनीची तुलना होत असून, यावर दिनेश कार्तिकने त्याचे मत मांडले आहे.

Pranali Kodre

Dinesh Karthik on MS Dhoni and Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी विजय मिळवला. या विजयात आर अश्विन, रविंद्र जडेजा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह यांच्याबरोबरत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचेही मोठे योगदान राहिले.

अपघातानंतर तंदुरुस्त होऊन ऋषभ पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी या सामन्यातून मैदानात उतरला होता. त्याने त्याचे हे पुनरागमन गाजवले देखील. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलबरोबर १६७ धावांची भागीदारी करताना १०९ धावांनी शतकी खेळी केली.

हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठरले. त्यामुळे त्याने एमएस धोनीच्या सहा कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.

भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये आता धोनी आणि पंत संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे या दोघांची तुलना होऊ लागली आहे. काहींनी तर ऋषभला भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज असंही म्हटलंय.

मात्र भारताचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने मात्र धोनी आणि ऋषभ यांची आत्ता लगेच तुलना होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.

कार्तिकने म्हटले की पंतला लगेचच कसोटीतील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज म्हणणे त्याला अमान्य आहे.

क्रिकबझशी बोलताना कार्तिक म्हणाला, 'ऋषभ सध्या फक्त ३४ कसोटी सामने खेळला आहे आणि तरी त्याला लगेचच सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज म्हणणे अमान्य आहे. थोडा वेळ थांबा, लगेचच निष्कर्षावर उडी मारू नका. पण हे देखील खरं आहे की ऋषभ योग्य मार्गावर आहे आणि तो नक्कीच भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज होऊनच थांबेल.'

कार्तिक म्हणाला, 'धोनीलाही यष्टीरक्षक म्हणून कमी समजू नका. त्याने फक्त चांगले यष्टीरक्षणच केले नाही, तर भारताला जेव्हा जेव्हा खूप गरज होती, तेव्हा त्याने धावाही केल्या आहेत. त्याने भारताला पहिल्यांदा कसोटीत अव्वल क्रमांकाची गदा मिळवण्याचा मानही त्याच्या नेतृत्वात मिळाला. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कोणत्याही खेळाडूबद्दल बोलता, तेव्हा त्या खेळाडूचा पूर्ण खेळ लक्षात घ्या.'

२६ वर्षीय ऋषभ पंतने ३४ कसोटीत ४४.७९ च्या सरासरीने आणि ६ शतके व ११ अर्धशतकांसह २४१९ धावा केल्या आहेत. नाबाद १५९ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. त्याने यष्टीरक्षण करताना १२० झेल आणि १४ यष्टीचीत केले आहेत.

तसेच धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये ३८.०९ च्या सरासरीने आणि ६ शतके व ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. त्याची २२४ ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. त्याने यष्टीरक्षण करताना २५६ झेल घेतले आहेत आणि ३८ यष्टीचीत केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT