Dinesh Karthik Set to play SA20 - मॅच फिनिशर दिनेश कार्तिक हा दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या कार्तिक लवकरच पार्ल रॉयल्स ( Paarl Royals) या राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या संघाकडून खेळताना दिसण्याचे वृत्त समोर येत आहे. SA20 चे नवीन पर्व ९ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे.
३९ वर्षांच्या कार्तिकने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आणि आता तो आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधून पुन्हा मैदानावर उतरणार आहे. या लीगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू असणार आहे. कार्तिकने भारताकडून १८० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि आयपीएल २०२४ मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून शेवटचा खेळला होता. आता तो RCB चा फलंदाज प्रशिक्षक व मेंटॉर अशा नव्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्वेंटी-२० क्रिकेटमधील कार्तिकचा अनुभव हा रॉयल्स संघाच्या कामी येणार आहे. कार्तिक सध्या दी हंड्रेड लीगमध्ये स्काय स्पोर्ट्ससाठी समालोचन करतोय. त्याच्याकडे ४०१ ट्वेंटी-२० सामन्यांचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाइट रायडर्ससह सहा फ्रँचायझीकडून खेळला आहे. त्याने KKR चे कर्णधारपदही भूषविले आहे. आयपीएलच्या मागील पर्वात तो फक्त दोन सामने खेळला नव्हता.
BCCI च्या नियमानुसार फक्त निवृत्त खेळाडूच परदेशी लीगमध्ये खेळू शकतात. मागच्या वर्षी अंबाती रायुडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीओट्स संघाकडून खेळला होता, तर रॉबिन उथप्पा व युसूफ पठाण हे ILT20 मध्ये दुबई कॅपिटल्सकडून खेळले होते. दोन वर्षांपूर्वी सुरेश रैना अबुधाबी टी १० लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळला होता.
दरम्यान, रॉयल्सने SA20 साठी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली.. कर्णधार डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी आणि अँडीले फेहलुक्वायो यांना संघात कायम राखले आहे. मागच्या पर्वात रॉयल्सने क्वालिफायरपर्यंत धडक मारली होती, परंतु त्यांना एलिमिनेटरमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्सकडून हार मानावी लागली.
पार्ल रॉयल्स संघ - डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, बीजॉर्न फॉर्टून, अँडिले फेहलुक्वायो, दिनेश कार्तिक, मिचेल व्हॅन बरेन, कोडी युसूफ, कैथ डडजीओन, एनकाबा पीटर, क्वेना मफाका, ल्हूआन ड्रे प्रेटोरियस, डयाना गलिएम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.