duleep trophy esakal
क्रिकेट

Ruturaj Gaikwad ची भारी कॅप्टन्सी! श्रेयसच्या संघाला पाजले पाणी, पण Axar Patelची चिवट खेळी

Swadesh Ghanekar

Duleep Trophy 2024 Ruturaj Gaikwad: दुलीप करंडक स्पर्धेत आज ऋतुराज गायकवाडने त्याच्या कॅप्टन्सीची झलक दाखवून दिली. भारत क संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या ऋतुराजने भारत ड संघाचे कंबरडे मोडले. ऋतुराजच्या डावपेचासमोर श्रेयस अय्यरच्या भारत ड संघाचा डाव १६४ धावांवर गडगडला. ६ बाद ४८ अशा अडचणीत सापडलेल्या भारत ड संघासाठी अक्षर पटेल ( Axar Patel) धावून आला. त्याच्या ८६ धावांनी भारत ड संघाला आधार दिला.

अथर्व तायडे ( ४) व यश दुबे ( १०) या जोडीला अंकुश कंबोजने धक्का दिला. कर्णधार श्रेयस व देवदत्त पड्डिकल दम दाखवतील असे वाटले होते, परंतु वैशाक विजयकुमारने दोघांचा अडथळा दूर केला. श्रेयस ९ धावांवर बाद झाला आणि पड्डिकल भोपळ्यावर माघारी परतला. हिमांशू चव्हाणने भारत ड संघाला पाचवा धक्का देताना रिकी भूईला ( ४) माघारी पाठवले.

केएस भरत ( १३) व अक्षर पटेल यांनी खिंड लढवली. एम सुतारने ही जोडी तोडली. सारांश जैन (१३) व अर्शदीप सिंग ( १३) यांनी अक्षरला साथ दिली. अक्षर पटेल मैदानावर उभा राहिला आणि त्याने ११८ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८६ धावांची खेळी केली. भारत ड संघाचा पहिला डाव ४८.३ षटकांत १६४ धावांवर गडगडला. भारत क संघाला ११ धावांवर पहिला धक्का बसला, साई सुदर्शन ( ७) हर्षित राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

दरम्यान, भारत अ आणि भारत ब सामन्यात मुशीर खानच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत ब ने ७ बाद १२८ धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत ब संघाला यशस्वी जैस्वाल ( ३०) व कर्णधार अभिमन्यू इश्वरन ( १३) यांनी चांगली सुरूवात करून दिली होती. आवेश खानने पहिला धक्का दिला. सर्फराज खानही ९ धावा करून आवेशच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. ५९ चेंडूंत ६ चौकारांसह ३० धावा करणाऱ्या ऋषभला खलिल अहमदने माघारी पाठवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flood Relief: पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्राकडून निधी, कोणत्या राज्याला किती मिळाले? महाराष्ट्राला सर्वाधिक मदत

Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी नाश्त्यात बनवा फ्रूटसॅलड, दिवसभर राहाल उत्साही

Mukesh Ambani Uddhav Thackeray: सर्वात मोठी बातमी! अनंत आणि मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मातोश्रीवर नेमकं काय घडतेय?

Latest Marathi News Updates : उद्योगपती मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, भेटीचं कारण अस्पष्ट

Iran Israel War Video: इस्रायलमध्ये हाहाकार इराणने डागली 100 हून अधिक क्षेपणास्त्रे; पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT