Sanju Samson  esakal
क्रिकेट

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

Duleep Trophy 2024 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत ड संघाकडून संजू सॅमसन याने शतकी खेळी केली.

Swadesh Ghanekar

Duleep Trophy 2024 Sanju Samson century : संजू सॅमसनने दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये आज भारत ड संघाकडून शतक झळकावले आहे. कर्णधार श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला आणि भारत ब संघाविरुद्ध खेळताना तो शून्यावरच बाद झाला. दुलीप ट्रॉफीत त्याच्या बॅटमधून ९, ५४, ०, ४१ आणि ० अशाच धावा निघाल्या. भारत ड संघाचे या स्पर्धेतील जेतेपदाचे आव्हान संपुष्टात आले आहे.

भारत ड संघाने पहिल्या दिवसअखेरीस पाच बाद ३०६ धावा केल्या होत्या. देवदत्त पडिक्कल (५० धावा), के. एस. भारत (५२ धावा), रिकी भुई (५६ धावा) व संजू सॅमसन (नाबाद ८९ धावा) यांनी भारत ड संघाकडून अर्धशतकी खेळी करताना भारत ब संघाविरुद्ध आपली चमक दाखवली.

भारत ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. देवदत्त पडिक्कल व श्रीकर भारत या भारत ड संघाच्या सलामी जोडीने १०५ धावांची भागीदारी करताना दमदार सुरुवात केली. नवदीप सैनीने देवदत्तला ५० धावांवर, तर मुकेशकुमारने के. एस. भारतला ५२ धावांवर बाद केले. रिकी भुई व निशांत सिंधू या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण फिरकी गोलंदाज राहुल चहर याने निशांत (१९ धावा), रिकी (५६ धावा) व श्रेयस अय्यर (०) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवत भारत ब संघासाठी मौल्यवान कामगिरी बजावली.

श्रेयस अय्यरप्रमाणे संजू सॅमसनसाठीही दुलीप ट्रॉफीतील कामगिरी महत्त्वाची आहे. त्याच्या बॅटमधूनही धावा निघत नव्हत्या; मात्र गुरुवारी त्याने ८३ चेंडूंमध्ये नाबाद ८९ धावांची फटकेबाजी केली. या खेळीमध्ये त्याने दहा चौकार व तीन षटकार मारले होते आणि आज त्या खेळीचे शतकात रुपांतर केले. त्याने १०१ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०६ धावांची खेळी केली. संघाच्या ८ बाद ३३६ धावा झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT