Sanju Samson - Abhimanyu Easwaran Sakal
क्रिकेट

Duleep Trophy: सॅमसनच्या शतकाला कॅप्टन ईश्वरनचे शतकी प्रत्युत्तर; मुशीर खानसह सूर्यकुमारही अपयशी

India B vs India D: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत संजू सॅमसनच्या शतकी खेळीला भारत ब संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरननेही शतकी खेळीने उत्तर दिले असले तरी त्याचा संघ भारत ड संघाविरुद्ध मोठ्या पिछाडीवर आहे.

सकाळ वृत्तसेवा

Duleep Trophy India B vs India D: संजू सॅमसनच्या शतकी खेळीला भारत ब संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरननेही शतकी खेळीचे उत्तर दिले तरी त्याचा संघ दुलीप करंडक स्पर्धेत भारत ड संघाविरुद्ध मोठ्या पिछाडीवर आहे कारण भरवशाचे मुशीर खान आणि सूर्यकुमार यादव अपयशी ठरले आहेत.

संजू सॅमसनने शानदार १०६ धावांची खेळी केली. त्यामुळे भारत ड संघाने पहिल्या डावात ३४९ धावांपर्यंत मजल मारली. या तुलनेत भारत ब संघाची दुसऱ्या दिवस अखेर ६ बाद २१० अशी अवस्था झाली आहे. या धावसंखेत अभिमन्यू ईश्वरनचा वाटा ११६ धावांचा आहे.

दुलीप करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात शानदार १८६ धावांची खेळी करणारा मुंबईचा मुशीर खान त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला होता. आता तिसऱ्या लढतीतही तो केवळ एकेरी धावांत बाद झाला. तर पहिल्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे खेळू न शकलेला सूर्यकुमार यादव प्रथमच खेळत आहे, परंतु तोही पाचच धावा करु शकला.

भारत ब संघाचा मधल्या फळीतील आणखी एक भरवशाचा फलंदाज नितीश कुमार रेड्डीला तर भोपळाही फोडता आला नाही. या तिन्ही फलंदाजांना अर्शदीप सिंगने बाद केले. दिवस अखेर वॉशिंग्टन सुंदर ३९ धावांवर किल्ला लढवत आहे.

तत्पुर्वी काल ८९ धावांवर नाबाद राहिलेल्या संजू सॅमसनने १०६ धावांची खेळी केली. यासाठी त्याने १०१ चेंडूंचाच सामना केला आणि त्यात १२ चौकार, ३ षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक: भारत ड, पहिला डाव ः ३४९ (देवदत्त पडिक्कल ५०, श्रीकर भरत ५२, रिकी भुई ५६, संजू सॅमसन १०६, नवदीप सैनी १९.३-२-७४-५, राहुल चहर १३-१-६०-३).

भारत ब, पहिला डाव: ६ बाद २१० (अभिमन्यू ईस्वरन ११६, मुशीर खान ५, सूर्यकुमार यादव ५, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे ३९, अर्शदीप सिंग १२-४-३०-३, आदित्य ठाकरे १४-३-३३-२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT