Joe Root Record: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बर्मिंगहॅम येथे होत आहे. या सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने खास विक्रम केला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २८२ धावांवरच संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजीला उतरला. इंग्लंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना जो रुटने १२४ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार मारले.
या खेळीदरम्यान त्याने कसोटीत १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रुटच्या आता १४३ सामन्यांमध्ये २६१ डावात १२०२७ धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३२ शतकांचा आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे.
रुट १२ हजार कसोटी धावा करणारा जगातील सातवा, तर इंग्लंडचा दुसराच क्रिकेटपटू आहे. इंग्लंडकडून यापूर्वी ऍलिस्टर कूकने असा पराक्रम केला आहे.
दरम्यान, रुट १२ हजार धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याने शनिवारी (२७ जुलै) १२ हजार कसोटी धावांचा टप्पा पार केला, तेव्हा त्याचे वय ३३ वर्षे २१० दिवस होते. सर्वात कमी वयात कसोटीत १२ हजार धावा कूकने केल्या होत्या.
कूकने ३३ वर्षे १० दिवस वय असताना १२ हजार कसोटी धावा केल्या होत्या. दरम्यान हा विक्रम करताना रूटने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने ३५ वर्षे १७६ दिवस वय असताना कसोटीत १२ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
तथापि असं असलं तरी डावांच्या तुलनेत मात्र रुट सर्वात धीम्या गतीनं १२ हजार धावा करणारा दुसरा खेळाडू ठरलाय. त्याने २६१ डावात या धावा केल्यात. सर्वाधिक डावा खेळल्यानंतर १२ हजार धावा करण्याचा विक्रम कूकच्याच नावावर आहे. त्याने २७५ डावात १२ हजार धावा केल्या होत्या.
रुट सध्या सर्वाधिक कसोटी शतके करण्याच्या यादीतही कूकच्या केवळ एक शतक मागे आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कूक ३३ शतकांसह अव्वल क्रमांकावर आहे, तर रुट ३२ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१५९२१ धावा - सचिन तेंडुलकर (३२९ डाव)
१३३७८ धावा - रिकी पाँटिंग (१६८ डाव)
१३२८९ धावा - जॅक कॅलिस (१६६ डाव)
१३२८८ धावा - राहुल द्रविड (१६४ डाव)
१२४७२ धावा - अॅलिस्टर कुक (१६१ डाव)
१२४०० धावा - कुमार संगकारा (१३४ डाव)
१२०२७ धावा - जो रूट (१४३ डाव)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.