Mark Wood | England Cricket team Sakal
क्रिकेट

England Cricket: 6.7 फूट उंचीच्या 'हल'ला इंग्लंड संघात मिळाली संधी, गोलंजादी अशी की घाबरतात फलंदाज, Video पाहा

ENG vs SL, Test: इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला असला, तरी त्यांचा अनुभवी गोलंदाज बाहेर झाल्याने मोठा धक्का बसला आहे. पण त्याच्याऐवजी ६.७ फूट उंच खेळाडूला संघात सामील करण्यात आले आहे.

Pranali Kodre

England vs Sri Lanka Test: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला. पण त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

मार्क वूडला पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अखेरच्या दोन्ही दिवशी मैदानातही उतरता आले नाही. त्याने पहिल्या सामन्यात २ विकेट्स घेतल्या होत्या.

आता तो बाहेर झाल्याने इंग्लंडने बदली खेळाडूची घोषणा केली आहे. त्याच्याऐवजी लिसेस्टरशायर क्लबकडून खेळणाऱ्या जोश हल याला संघात संधी दिली आहे. त्याला २०२२ मध्ये लिसेस्टरशायर क्लबकडून वरिष्ठ स्तरावर खेळण्याची संधी मिळाली होती.

त्याची उंची चर्चेचा विषय ठरली होती. त्याची ६ फुट ७ इंच उंची आहे. तो ऑगस्ट २०२२ मध्ये १९ वर्षांखालील इन्विटेशनल इलेव्हनकडून १९ वर्षांखालील श्रीलंका संघाविरूद्धही तीन दिवसीय सामना खेळला होता.

त्याने २०२३ मध्ये लिसेस्टरशायरला वनडे कप जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता.

दरम्यान, इंग्लंड आणि श्रीलंका संघातील दुसरा कसोटी सामना २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यानंतर ६ सप्टेंबरपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे.

  • इंग्लंडचा संघ - ऑली पोप (कर्णधार), गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हल, डॅन लॉरेन्स, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT