Ben Stokes vs PAK esakal
क्रिकेट

PAK vs ENG 2nd Test : आला रे आला...! पाकिस्तानला झोडायला इंग्लंडने स्टार अष्टपैलू खेळाडू बोलावला, कर्णधारही बदलला

Swadesh Ghanekar

England playing XI for second Test v Pakistan - इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. पाकिस्तानला पहिल्या कसोटीत दारूण पराभूत केल्यानंतर इंग्लंड दुसरी कसोटी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या कसोटीत पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा करूनही इंग्लंडने एक डाव व ४७ धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता यजमान पाकिस्तान मालिकेत पुनरागमनासाठी आतुर आहेत. मात्र, त्यांच्यासमोरील अडचण वाढवण्यासाठी इंग्लंडने डाव खेळला आहे.

पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना १५ ऑक्टोबरपासून मुलतानला सुरु होणार आहे. त्यानंतर तिसरा सामना २४ ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे सुरु होईल. तत्पूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली होती. निवड समितीने अनुभवी फलंदाज बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यांना कसोटी संघातून वगळलं आहे. नसीम शाहलाही संघात संधी देण्यात आलेली नाही. मात्र, कर्णधार शान मसूदला संघात कायम करण्यात आले आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ

शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.

बेन स्टोक्स आला...

इंग्लंडच्या संघात कर्णधार बेन स्टोक्स परतला आहे. तो दुसऱ्या कसोटीत कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी गस अॅटकिन्सन व ख्रिस वोक्स यांना विश्रांती दिली गेली आहे. स्टोक्ससह मॅट पॉट्स याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली आहे. स्टोक्सला हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे मागील चार कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. पण, तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पॉट्स हा ऑगस्ट महिन्यानंतर पहिली कसोटी खेळणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, जॅमी स्मिथ, ब्रेडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

Election Commission Press Conference LIVE : ठरलं! महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला होणार मतदान

Maharashtra Assembly Election 2024: पंकज भुजबळांनाच आमदारकी का? महायुतीने मराठा मतांचा नाद सोडून दिलाय का? 'असं' आहे राजकीय गणित

Ladki Bahin Yojana: ''निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविलेल्या फुकटच्या योजना म्हणजे लाच'' निवडणूक आयोगासह सरकारला कोर्टाची नोटीस

Noel Tata: टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा भारताचे नागरिक नाहीत; कोणत्या देशाचे आहेत नागरिक?

SCROLL FOR NEXT