England Cricket Team Sakal
क्रिकेट

T20 World Cup: गतविजेत्या इंग्लंडचा 19 चेंडूत विजय, पण तरी स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार, पाहा काय आहेत समीकरणे

England Qalification Scenario: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर होण्याची टांगती तलवार सध्या गतविजेत्या इंग्लंडवर आहे. त्यांच्यासाठी पुढील समीकरण कसे आहे जाणून घ्या.

Pranali Kodre

England Team Qualification Scenario: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत इंग्लंडने ओमानविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. पण असे असले तरी अद्याप त्यांचे सुपर-8 मधील स्थान पक्के झालेले नाही.

इंग्लंडने ओमानविरुद्ध 19 चेंडूत विजय मिळवला होता. ओमानने दिलेल्या 48 धावांचे आव्हान इंग्लंडने 3.1 षटकात पूर्ण केले. त्यामुळे इंग्लंडचे आता 3 गुण झाले आहेत. इंग्लंडने 3 सामन्यांपैकी 1 विजय आणि 1 पराभव स्विकारला आहे. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

इंग्लंड या स्पर्धेत पहिल्या फेरीमध्ये ग्रुप बी मध्ये आहे. या ग्रुपमध्ये इंग्लंडच्या ओमानवरील विजयामुळे नामिबिया आणि ओमान या दोन्ही देशांचे आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने या ग्रुपमध्ये पहिले तिन्ही सामने जिंकत 6 गुणांसह सुपर-8 मधील स्थान पक्के केले आहे.

त्यामुळे आता या ग्रुपमध्ये दुसरा क्रमांक मिळवून सुपर-8 गाठण्यासाठी इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन संघातच चूरस आहे. स्कॉटलंडने 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे त्यांचे 5 गुण आहेत. त्यामुळे स्कॉटलंड सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आता इंग्लंडचा पहिल्या फेरीतील अखेरचा सामना 15 जून रोजी नामिबियाविरुद्ध अँटिग्वाला होणार आहे, तर स्कॉटलंडचा सामना सेंट लुसियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंडला पुढच्या फेरीत जायचे असेल, तर विजय मिळवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

त्यातही स्कॉटलंड सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पराभूत झाले, तरी ते सुपर-8 मध्ये जाऊ शकतात. मात्र, त्यांना आशा करावी लागेल की नामिबिया इंग्लंडचा पराभव करेल.

जर इंग्लंडने नामिबियाला पराभूत केले आणि जर स्कॉटलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत व्हावे लागले, तर स्कॉटलंड सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडतील. यामागे कारण म्हणजे इंग्लंडचा नेट रन रेट हा स्कॉटलंडपेक्षा चांगला आहे.

त्यामुळे स्कॉटलंडला हीच आशा असेल की इंग्लंडने त्यांचा अखेरचा सामना पराभूत व्हावा किंवा स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे. तसेच इंग्लंडबाबत सांगायचे झाले, तर त्यांना नामिबियाविरुद्ध विजय तर मिळवावा लागेलच, पण स्कॉटलंडच्या पराभवाचीही वाट पाहवी लागेल.

पाऊस पडला तर...

याशिवाय सध्या अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्या सामन्यांमध्येही पाऊस पडला आणि सामना रद्द करावा लागला, तर स्कॉटलंडला याचा फायदा होईल.

जर इंग्लंड विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल, अशात इंग्लंड 5 गुणांपर्यंत पोहचू शकणार नाही. त्यामुळे स्कॉटलंड सुपर-8 साठी पात्र ठरतील.

तसेच जरी इंग्लंडने नामिबियाला पराभूत केले आणि स्कॉटलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाला, तरी स्कॉटलंड 6 गुणांसह सुपर-8 साठी पात्र ठरेल. त्यामुळे इंग्लंडची हीच अपेक्षा असेल की काहीही झाले तरी दोन्ही पैकी कोणताच सामना पावसामुळे रद्द होऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

WBBL, Video: कडक! स्मृती मानधानाने पळत येत घेतला अफलातून कॅच, Video होतोय व्हायरल

Pune Assembly Election 2024 : खा मटण, दाबा आमचे बटण; मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Kelara Beach : हिवाळ्यात केरळ फिरायचं प्लॅन करत आहात का ? तर या ५ बीच ला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT