Mohammed Shami esakal
क्रिकेट

Explained :Mohammed Shami ची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड का नाही झाली? त्याने केलेला दावा चुकीचा निघाला

Is Mohammed Shami Injured? आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काल झाली. या संघात मोहम्मद शमीचं नाव नसल्याने पुन्हा एकदा त्याच्या दुखापतीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Swadesh Ghanekar

Indian Squad for New Zealand Test Series : बांगलादेशला नमवल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावरील वर्चस्व कायम राखण्याच्या निर्धाराने न्यूझीलंडचा सामना करणार आहे. बीसीसीआयने १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी संघ काल जाहीर केला आणि जसप्रीत बुमराहकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा दिली गेली. पण, या संघात मोहम्मद शमीचं नाव नसल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपासून शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, त्याचे संघात नाव नसल्याने पुन्हा तो दुखापतीतून बरा का होत नाहीए, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Jasprit Bumrah Vice Captain

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात जसप्रीत बुमराह याच्याकडे उप कर्णधारपद पुन्हा सोपवले गेले आहे. मागील मालिकेत टीम इंडियाचा उप कर्णधार कोणीच नव्हता. पण, आता जसप्रीतकडे ही जबाबदारी पुन्हा आली आहे. याचाच अर्थ असा की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत जसप्रीत नेतृत्व करणार दिसेल. रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन कसोटीला मुकण्याचे संकेत मिळत आहेत.

Mohammed Shami Injured?

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मोहम्मद शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो क्रिकेट खेळलेला नाही. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेतोय आणि याच दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे, वृत्त समोर येत आहे. त्यामुळेच त्याच्या पुनरागमनाची घाई बीसीसीआयला करायची नाही. तो नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या IND vs AUS यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतून पुनरागमन करण्याची शक्यता होती. पण, आता त्याही मालिकेला तो मुकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शमीने काही दिवसांपूर्वी त्याच्या दुखापतीच्या वृत्ताचा स्पष्ट नकार दिला होता, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड न होणे, हे सर्व चित्र स्पष्ट करते.

भारतीय संघ ( न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी) - रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप; राखीव खेळाडू - हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयांक यादव व प्रसिद्ध कृष्णा

IND vs NZ Test Series Schedule

  • पहिली कसोटी - १६ ते २० ऑक्टोबर, बंगळुरू

  • दुसरी कसोटी - २४ ते २८ ऑक्टोबर, पुणे

  • तिसरी कसोटी - १ ते ५ नोव्हेंबर, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT