MS dhoni eskal
क्रिकेट

Fact Check : चेन्नई सुपर किंग्स संघ सोडण्यासाठी MS Dhoni ला फ्रँचायझीकडून २५ कोटींची ऑफर?

Swadesh Ghanekar

BCCI retention IPL 2025 Auction : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) इंडियन प्रीमिअर लीग २०२५ पूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी अद्याप नियम जाहीर केलेले नाही. विविध मीडियाच्या माहितीनुसार बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझींना किमान ५ खेळाडूंना रिटेन म्हणजेच संघात कायम राखण्याची परवानगी देणार आहे. पण, असे करताना फ्रँचायझींकडून RTM ( राईट टू मॅच ) हा पर्याय काढून घेतला जाणार आहे. त्यामुळे फ्रँचायझी त्यांच्या सध्याच्या संघातून कोणत्या पाच खेळाडूंना कायम राखते, याची सर्वांना उत्सुकता आहे.

BCCI आणि फ्रँचायझी मालकांची मुंबईत बैठक झाली होती. त्यात बऱ्याच फ्रँचायझींचा मेगा ऑक्शनला विरोध असल्याचे जाणवले आणि त्यांनी ५-६ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी बीसीसीआयकडे मागितली. त्यानुसार बीसीसीआय ५ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांचा फॅनबेस खूप मोठा आहे. त्यामुळे या संघांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनीचं काय

हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच IPL 2025 मध्ये रोहित दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळेल, असा तर्क लावला जात आहे. पण, MI इतक्या सहज हिटमॅनला सोडणार नाही, पण वय हा फॅक्टर रोहितच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. तेच ४१ वर्षीय MS Dhoni याच्याही आयपीएल २०२५ खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. धोनीनेही अद्याप याबाबत आपला निर्णय कळवलेला नसल्याचे CEO काशी विश्वनाथ यांनी सांगितले होते.

धोनीला CSK सोडण्यासाठी २५ कोटींची ऑफर

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने सर्वाधिक जेतेपदाच्या शर्यतीत मुंबईला टक्कर दिली आहे. मागील पर्वात धोनीने नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे धोनीच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. तो लंगडतानाही दिसला. त्यामुळेच तो पुढील पर्वात खेळेल की नाही ही शंका मनात आहेच..

धोनीला संघात कमी किमतीत कायम राखता यावे यासाठी अनकॅप्ड खेळाडूचा नियम आणण्याची विनंती CSK ने केल्याचे वृत्त होते. पण, ते खोटे असल्याचे फ्रँचायझीने म्हटले. त्यात आता आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात MS Dhoni ला चेन्नई सुपर किंग्समधून बाहेर पडण्यासाठी CSK चे CEO विश्वनाथ यांनी २५ कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे. पण, यात कोणतेही तथ्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

General Coaches in Trains : मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो १७ आणि १८ ऑक्टोबरला पाणी जपून वापरा; पालिकेकडून १०% पाणी कपात

Bomb Threats to Flights : विमानांच्या उड्डाणात धमक्यांचा अडथळा! गेल्या तीन दिवसांत बारा विमानांची उड्डाणे रद्द

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

SCROLL FOR NEXT