Bangladesh vs Sri Lanka: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना 30 एप्रिल पासून सुरू झाला आहे. चितगावला होत असलेल्या या सामन्यात बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांकडून काही गमतीशीर चूका झाल्या आहेत. याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
याच सामन्यात तिसऱ्या दिवशीही बांगलादेशी क्षेत्ररक्षकांचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला, ज्यात एका चेंडूमागे 5 खेळाडू पळताना दिसत आहेत.
ही घटना श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात घडली. झाले असे की श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू असताना 21 व्या षटकात हसन मेहमूदच्या गोलंदाजीवर प्रभात जयसूर्याने गलीच्या दिशेने शॉट मारला.
यावेळी बांगलादेशचे चक्क पाच खेळाडू त्या चेंडूला पकडण्यासाठी धावले, अखेर पाँइंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने आधी पोहचत चेंडू पकडला. पण या गमतीशीर घटनेवर सध्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशेष म्हणजे अशी चूक करण्याची ही बांगलादेश क्षेत्ररक्षकांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी श्रीलंकेच्या पहिल्या डावातही प्रभातनेच मारलेल्या शॉटवर स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या तीन बांगलादेशी खेळाडूंनी प्रयत्न करूनही झेल घेता आला नव्हता.
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर श्रीलंकेने पहिल्या डावात 159 षटकात सर्वबाद 531 धावा केल्या. बांगलादेशकडून कुशल मेंडिसने सर्वाधिक 93 धावा केल्या, तर कामिंदू मेंडिसने 92 धावांची खेळी केली.
याशिवाय दिमुथ करुणारत्ने (86), निशान मदुशका (57), दिनेश चंडिमल (59) आणि धनंजय डी सिल्वा (70) यांनीही अर्धशतके केली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 68.4 षटकात 178 धावांवरच संपला. बांगलादेशकडून झाकिर हसनने 54 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त बांगलादेशकडून कोणालाही खास काही करता आले नाही. त्यामुळे श्रीलंकेला तब्बल 353 धावांची आघाडी मिळाली.
श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने 4 विकेट्स घेतल्या, तसेच विश्व फर्नांडो, लहिरू कुमारा आणि प्रभात जयसुर्या यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
यानंतर श्रीलंकेने 40 षटकात 7 बाद 157 धावा करत दुसरा डाव घोषित केला. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्युजने 56 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून हसन मेहमूदने 4 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.