Mohammad Yousuf Sakal
क्रिकेट

Pakistan Cricket मध्ये पुन्हा मोठा बदल! माजी दिग्गजाने दिला सिलेक्टर पदाचा राजीनामा, कारणही सांगितलं

Pranali Kodre

Mohammad Yousuf: पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीमधील निवडकर्ता म्हणून राजीनामा दिला आहे.

५० वर्षीय मोहम्मद युसूफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी हा निर्णय वैयक्तिक कारणाने घेतला आहे.

त्यांनी लिहिले, 'पाकिस्तान क्रिकेट संघाचा निवडकर्ता पदाचा मी वैयक्तिक कारणाने राजीनामा देत आहे. या संघाची सेवा करायला मिळाली, याचा मला अभिमान आहे. पाकिस्तान क्रिकेटच्या यशात आणि विकासासाठी योगदान दिल्याबद्दल आनंद आहे. मला आपल्या खेळाडूंच्या प्रतिभेवर विश्वास आहे. संघाला आणखी यश मिळवून देत राहण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.'

मोहम्मद युसूफ यांना मार्च २०२४ मध्ये निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी टी२० वर्ल्ड कप २०२४ साठी पाकिस्तान संघही निवडला होता. तसेच बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठीही त्यांनी संघ निवडला होता. पण आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान युसूफ यांनी १९९८ ते २०१० दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. यादरम्यान त्यांनी ९० कसोटी सामने खेळले असून ५२.२९ च्या सरासरीन ७५३० धावा केल्या. यामध्ये २४ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच २८८ वनडे सामने खेळले असून ९७२० धावा केल्या आहेत. यामध्ये १५ शतके आणि ६४ अर्धशतके केली आहेत. त्यांनी ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळले असून ५० धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर... विरोधकांना थेट इशारा, नागपुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Akshay Shinde: कळवा रुग्णालयातून मृतदेह पाठवल्यापासून ते दफनविधीपर्यंत नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण प्रकरण...

"त्याने माझी फसवणूक केली", युट्युबर फ्लाईंग बिस्ट म्हणजेच गौरव तनेजाच्या पत्नीचा कथित व्हिडीओ व्हायरल, "माझ्या मुलांची आई..."

Steve Smith पुन्हा झाला वनडे कर्णधार, पण मिचेल मार्शने का घेतली माघार? जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Live Updates: नागपुरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

SCROLL FOR NEXT