Ajay Jadeja Jam Sahab Esakal
क्रिकेट

Ajay Jadeja: माजी क्रिकेटपटू होणार जामनगरचा पुढील महाराजा; जाणून घ्या, राजघराण्याचा इतिहास

Ajay Jadeja Jam Sahab: याच कुटुंबातील अजय जडेजाने 1992 ते 2000 पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी 15 कसोटी सामने आणि 196 एकदिवसीय सामने खेळले.

आशुतोष मसगौंडे

जामनगर राजघराण्याचा पुढील वारस म्हणून माजी क्रिकेटपटू अजय जडेजाची निवड करण्यात आली आहे. जाम साहेब शत्रुशल्य सिंह महाराज यांनी शनिवारी सकाळी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.

अजय जडेजाने याआधीच भारतीय क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. अलीकडेच तो T20 विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तान संघाने चमकदार कामगिरी केली होती.

शत्रुशल्यसिंहजी म्हणाले, "दसरा हा तो दिवस आहे जेव्हा पांडवांनी 14 वर्षांचा वनवास यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विजयाचा अनुभव घेतला होता. आज मलाही विजयी झाल्यासारखे वाटत आहे, कारण अजय जडेजाने माझा उत्तराधिकारी आणि नवानगरचा पुढचा जाम साहेब होण्याचे मान्य केले आहे. ज्याला मी खरोखरच मोठा मानतो." ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांंनी अजय जडेजाचे आभारही मानले.

जामनगरच्या राजघराण्याला क्रिकेटचा समृद्ध वारसा आहे. प्रतिष्ठित रणजी करंडक आणि दुलीप करंडक यांना जडेजांचे नातेवाईक केएस रणजीतसिंहजी आणि केएस दुलीपसिंहजी यांचे नाव देण्यात आले आहे.

याच कुटुंबातील अजय जडेजाने 1992 ते 2000 पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी 15 कसोटी सामने आणि 196 एकदिवसीय सामने खेळले.

त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण 1996 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आला, जेव्हा त्याने भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला हो. जडेजाने अवघ्या 25 चेंडूत 45 धावा केल्या होत्या, त्यापैकी 40 धावा वकार युनूसच्या शेवटच्या दोन षटकात आल्या. फलंदाजीसोबतच जडेजाच्या क्षेत्ररक्षणाचेही खूप कौतुक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT