Team India Sakal
क्रिकेट

IND vs SL: मॉर्ने मॉर्केल नाही, तर 'हा' माजी भारतीय खेळाडू श्रीलंका दौऱ्यात असणार टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक

Pranali Kodre

India Bowling Coach for Sri Lanka Tour: भारतीय क्रिकेट संघाला जुलैच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. २७ जुलैपासून चालू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात भारताला ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवडही झाली आहे. आता या दौऱ्यासाठी भारतीय संघासह प्रभारी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुले जाणार आहे. बहुतुले हे झिम्बाब्वे दौऱ्यातही भारतीय संघासह होते. तसेच ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत.

बहुतुले यांनी भारतासाठी २ कसोटी आणि ८ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत ३ विकेट्स आणि वनडेत २ विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची शानदार कामगिरी राहिली आहे. १८८ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी ६३० विकेट्स घेतल्या आहेत, तर १४३ लिस्ट ए क्रिकेटमध्ये १९७ विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार सध्या मॉर्ने मॉर्केल उपलब्ध नसल्याने बहुतुले यांना संधी दिल्याचे सांगितले जात आहे.

आगामी श्रीलंका दौरा हा गौतम गंभीरचाही भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलाच दौरा आहे. दरम्यान, बीसीसीआयने आत्तापर्यंत नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली असली, तरी बाकी सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती केलेली नाही.

पण मिडिया रिपोर्ट्सनुसार श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने सपोर्ट स्टाफमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर आणि रायन टेन डोईशेट यांचा समावेश केला आहे.तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून टी दिलीप यांना कायम केले आहे.

टी दिलीप यापूर्वीही राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते. टी२० वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफमधील विक्रम राठोड, पारस म्हाब्रे आणि टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला होता. पण टी दिलीप यांना पुन्हा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून कायम केले जाणार असल्याचे समजत आहे.

याशिवाय अभिषेक नायर आणि डोईशेट यांनाही श्रीलंका दौऱ्यानंतरही गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षकासाठी मॉर्केलची चर्चा आहे. कदाचीत तो श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघासाठी उपलब्ध राहू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT