Billy Ibadulla Passed Away Sakal
क्रिकेट

Pakistan Cricket: पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या पाकिस्तानी क्रिकेटरचं निधन

Pranali Kodre

Billy Ibadulla Passed Away : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बिली इबादुल्ला यांचे शुक्रवारी (१२ जुलै) निधन झाले. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इबादुल्ला यांच्या निधनाबद्दल क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त होत आहे. त्यांनी १९६४ ते 1967 दरम्यान पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळले.

कराचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करताना त्यांनी पहिल्या डावात १६६ धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे ते कसोटी पदार्पणात शतक करणारे पाकिस्तानचे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी अब्दुल कादीर यांच्याबरोबर २४९ धावांची विक्रमी भागीदारीही केली होती.

मात्र या सामन्यांनंतर त्यांना नंतर सातत्य राखता आले नाही. ते आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत 4 कसोटी सामने खेळू शकले. त्यांनी यात २५३ धावा केल्या आणि १ विकेट घेतली. पण असे असले तरी त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवले, विशेषत: वार्विकशायरकडून काउंटी क्रिकेट खेळताना.

त्यामुळे या संघाकडूनही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. वार्विकशायरचे अध्यक्ष डेनिस एमिस यांनी म्हटले 'ते खूप स्पेशल खेळाडू होते. एक दिग्गज आम्ही एकत्र खूप चांगला वेळ घालवला होता. ते कधी कधी मस्करीही करायचे.'

तसेच पाकिस्तान क्रिकेटनेही त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

इबादुल्ला यांनी ४१७ प्रथम श्रेणी सामने खेळले. यातील ३७७ सामने त्यांनी वार्विरशायरकडून खेळले. त्यांनी ४१७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १७०७८ धावा केल्या, ज्यात २२ शतके आणि ८२ अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याचबरोबर ४६२ विकेट्स घेतल्या. इबादुल्ला यांनी ६४ लिस्ट ए क्रिकेट सामनेही खेळले, ज्यात त्यांनी ८२९ धावा केल्या, तर ८४ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT