FORMER SRI LANKA CRICKETER DHAMMIKA NIROSHAN SHOT DEAD sakal
क्रिकेट

ब्रेकिंग : श्रीलंकन क्रिकेटपटूची हत्त्या, पत्नी अन् २ मुलांसमोर घातल्या गोळ्या

सकाळ डिजिटल टीम

Former Sri Lanka Cricketer Shot Dead - बुधवारची सकाळ ही श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांना धक्कादायक बातमी घेऊन उजाडली. श्रीलंकेचा ४१ वर्षीय माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशाना ( Dhammika Niroshana) याची राहत्या घरी अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोर निरोशान याच्या घरी आणि तो त्याची पत्नी आणि दोन मुलांसह असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या.

४१ वर्षांच्या निरोशानाने श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आणि २००० मध्ये सिंगापूरविरुद्ध त्याने पदार्पण केले. तो दोन वर्षे १९ वर्षांखालील संघाकडून कसोटी आणि वन डे क्रिकेट खेळला, दहा सामन्यांत संघाचे नेतृत्वही केले. गोळीबारामागचा हेतू अद्याप अस्पष्ट असून, संशयित अद्याप फरार आहे. अंबालनगोडा पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी आणि गुन्ह्याचे कारण शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत.

२२ फेब्रुवारी १९८३ मध्ये निरोशानाचा जन्म झाला. सीनियर्स प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने श्रीलंकेच्या शालेय एकादश संघाचे प्रतिनिधित्व केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चिलावा मरिन्स क्रिकेट क्लब व गॅल्ले क्रिकेट क्लबकडून खेळला. गोलंदाज निरोशानाची प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये सरासरी ३०च्या खाली होती. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२ सामन्यांत २६९ धावा केल्या आणि १९ विकेट्स घेतल्या. लिस्ट ए मध्ये ८ सामन्यांत ५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School Girls: पुण्यातील संतापजनक घटनेनंतर फडणवीसांनी दिले मोठे आदेश, आता संस्थाचालकांना...

Gold Rate Today: सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावर; भू-राजकीय तणावाचा परिणाम, किती वाढले भाव?

Uddhav Thackeray : असुरांचा संहार करण्यासाठी, मशाल हाती दे... ठाकरे गटाचं प्रचाराचं नारळ फुटलं, उद्धव ठाकरेंच्या हस्ते गीत लाँच

ट्रॉफी बारामतीलाच आली पाहिजे! गुलीगत फेम सुरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळे मैदानात; केलं वोट करण्याचं आवाहन

Sadhguru Jaggi Vasudev: जग्गी वासुदेव यांच्या पायांच्या फोटोंची किंमत ३ हजार २०० रुपये; वेबसाईट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल

SCROLL FOR NEXT