Rohit Sharma Virat Kohli to play 2027 ODI World Cup sakal
क्रिकेट

Gautam Gambhir Press Conference: रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळतील का? गौतमचं 'गंभीर' विधान

Gautam Gambhir On Rohit Sharma, Virat Kohli 2027 World Cup: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया पहिला दौरा खेळण्यासाठी श्रीलंकेला आज रवाना होणार आहे. यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम व अजित आगरकर यांनी अनेक मुद्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Swadesh Ghanekar

Gautam Gambhir Press Conference Live: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया पहिला दौरा खेळण्यासाठी श्रीलंकेला आज रवाना होणार आहे. ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी BCCI ने संघ जाहीर केले आहेत. सूर्यकुमार यादव हा ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून या मालिकेत दिसणार आहे. रोहित शर्माकडे वन डे संघाचे नेतृत्व कायम आहे. विराट कोहलीनेही सुट्टी संपवून मालिकेत खेळण्यासाठी होकार दिला आहे. रोहित व विराट ही दोघं २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का, यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मोठं भाष्य केलं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मागील महिन्यात वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० तून निवृत्ती घेतली आहे. ते वन डे संघात आहेत, परंतु दोघांनीही पस्तीशी ओलांडली आहे. ते आणखी किती वर्ष खेळतील हा प्रश्न सध्या आहे? गंभीरने हा निर्णय खेळाडूंवर सोपवला आहे, आपण फिटनेस राखू शकतो, असे त्यांना वाटत असेल तर ते खेळत राहतील, असे गौतमन स्पष्ट केले.

गौतम गंभीर म्हणाला, "मला वाटते की ते मोठ्या स्पपर्धेत काय करू शकतात हे त्यांनी त्यांनी दाखवून दिले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी आपणे नाणे खणखणीत वाजवले आहे." गौतम गंभीर पुढे म्हणाला, "मी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू शकतो की त्या दोघांमध्ये भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा, यामुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. जर ते त्यांचा फिटनेस राखू शकतील, तर ते २०२७ चा वर्ल्ड कप देखील खेळतील.''

हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल असे स्पष्ट करताना गौतम म्हणाला, ''त्यांच्यात किती क्रिकेट शिल्लक आहे, हे मी सांगू शकत नाही. शेवटी, हे त्यांच्यावर देखील अवलंबून आहे.ते संघाच्या यशात किती योगदान देऊ शकतात, हेही महत्त्वाचे आहे. विराट आणि रोहित काय करू शकतात हे पाहता, मला वाटते की त्यांच्याकडे अजूनही भरपूर क्रिकेट आहे. ते अजूनही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत आणि साहजिकच कोणत्याही संघाला या दोघांना शक्य तितक्या काळ खेळायचे आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

SCROLL FOR NEXT