Gautam Gambhir bids farewell to Kolkata Knight Riders sakal
क्रिकेट

Gautam Gambhirनं इमोशनल केलं! KKR साठीच्या निरोपाच्या Videoत मनातलं सर्व काही सांगितलं

Gautam Gambhir bids farewell - गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले.

सकाळ डिजिटल टीम

Gautam Gambhir bids farewell to KKR : गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आणि कोलकाताच्या चाहत्यांसाठी एक भावनिक व्हिडीओ मंगळवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट केला. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली KKR ने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे जेतेपद पटकावले. २०१२ व २०१४ मध्ये गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने आयपीएल ट्रॉफी उंचावली होती आणि त्यानंतर त्यांना एकही जेतेपद पटकावता आले नाही. पण, आयपीएल २०२४ साठी गंभीर मार्गदर्शक म्हणून परतला आणि त्याच्या रणनितीने संघाला जेतेपद पटकावून दिले.

गौतम गंभीर आणि कोलकाताचे नाते खूप खास आहे. बॉलिवूड शेहनशाह व KKR चा सहमालक शाहरुख खान याने गंभीरला पुन्हा फ्रँचायझीसोबत जोडण्यासाठी ब्लँक चेक देऊ केला होता. एवढं हे नातं घट्ट आहे. गंभीरने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना KKR ला तिसरे जेतेपद पटकावून दिले.

गौतम गंभीरने आता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविडचा टीम इंडियाचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर गंभीरची बीसीसीआयने निवड केली. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा पहिला दौरा हा श्रीलंका असणार आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यामुळे गंभीरला कोलकाता फ्रँचायझीचे पद सोडणे भाग होते. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अर्थात हितसंबंध जपणे नियमानुसार गंभीरला KKR चे मेंटॉरपद सोडणे भाग होते.

गौतमने टीम इंडियासोबत नवी इनिंग्ज सुरू करताना कोलकाता नाईट रायडर्स व कोलकाता वासियांना भावनिक संदेश पाठवला आहे. त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्यात तो म्हणतोय,''तुम्ही हसता तेव्हा मी हसतो. तुम्ही रडता तेव्हा मी रडतो. तुम्ही जिंकल्यावर मी जिंकतो. तुम्ही हरल्यावर मी हरतो. जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता तेव्हा मी स्वप्न पाहतो. जेव्हा तुम्ही ते साध्य करता तेव्हा मी साध्य करतो.''

'आपला एकमेकांवर विश्वास आहे. मी तुमचा कोलकाता आहे, तुमच्यापैकी एक आहे. मला तुमचा संघर्ष माहित आहे. नकारांनी मला चिरडून टाकले आहे, परंतु तुमच्याप्रमाणे मी नव्या उमेदीला आलिंगन देऊन जागा होतो. मी रोज हरतो पण तुमच्यासारखा अजून माझा पराभव व्हायचा आहे,''असेही त्याने म्हटले.

तो पुढे म्हणतोय,'' तुम्ही मला लोकप्रिय व्हायला सांगतात. मी त्यांना विजेता होण्यासाठी सांगतो. मी तुमचा कोलकाता आहे. मी तुमच्यापैकी एक आहे. ही कोलकात्याची हवा माझ्याशी बोलते. आवाज, रस्ते, ट्रॅफिक जाम हे सर्व तुम्हाला कसे वाटते ते सांगते. तुम्ही काय म्हणता ते मी ऐकतो, पण तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला माहीत आहे. मला माहीत आहे की तुम्ही भावनिक आहात, मीही आहे. कोलकाता, आम्ही एक बंध आहोत, आम्ही एक कथा आहोत. आम्ही एक संघ आहोत आणि आम्हाला एकत्र काही वारसा निर्माण करावा लागेल, याची वेळ आली आहे.''

''एक नवीन स्क्रिप्ट लिहिण्याची गरज आहे. ही स्क्रिप्ट जांभळ्या शाईने नाही तर त्या निळ्या रंगाने लिहायची आहे. मी नवीन इनिंग्ज सुरू करायचा जातोय,''असेही गंभीरने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT