PR Sreejesh | India Hockey Team Sakal
क्रिकेट

Paris Olympic 2024: हे भारीये! पीआर श्रीजेशनं ब्रिटनला हरवल्यानंतर दाखवलं हॉकी स्टीकवरील पत्नीचं नाव, पाहा Video

PR Sreejesh Video: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनला क्वार्टरफायनलमध्ये शूटआऊटमध्ये पराभूत केल्यानंतर सेलिब्रेशन करताना भारताचा गोलकिपर पीआर श्रीजेशनं हॉकी स्टीकवर पत्नीचं नाव लिहिलेलं असल्याचंही दाखवलं.

Pranali Kodre

India vs Great Britain Hockey Match at Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय हॉकी संघ पदकापासून अवघ्या एक पाऊल दूर आहे.

भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला शुटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताचा गोलकिपर पीआर श्रीजेशची शानदार कामगिरी झाली. त्याने चांगला बचाव करताना भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

शुटआऊटमध्येही पीआर श्रीजेशने ब्रिटनचे दोन प्रयत्न हाणून पाडले. या विजयानंतर भारताच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. यावेळी श्रीजेशही खूप आनंदात दिसला.

याचदरम्यान, त्याने त्याच्या हॉकी स्टीकवर त्याच्या पत्नीचे नाव लिहिलेलंही कॅमेऱ्याला दाखवले आणि हा विजय संपूर्ण देशासह तिलाही समर्पित केला. त्याच्या हॉकी स्टीकवर अनिशा (Aneeshya) नाव लिहिलेलं होतं.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की श्रीजेशने यापूर्वीच सांगितलं आहे की पॅरिस ऑलिम्पिकनंतर तो आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे आता तो त्याच्या कारकिर्दीतील अखेरचे दोन सामने खेळताना दिसेल.

याबाबतही सामन्यानंतर श्रीजेश म्हणाला, 'आज जेव्हा मी मैदानात आलो, तेव्हा दोनच पर्याय होते. हा कदाचीत माझा अखेरचा सामना असेल किंवा मला आणखी दोन सामने खेळण्याती संधी मिळेल. आणि आता मला आणखी दोन सामने खेळण्याची संधी आहे.'

सामन्याबद्दल तो म्हणाला, 'गोल रोखणे हे गोलकिपरचे नेहमीचेच काम आहे. आजचा आमचा दिवस होता. अगदी शुटआऊटमध्येही ज्या खेळाडूंनी शॉट्स खेळले, त्यांनी निराश केलं नाही. त्यांनी (भारतीय खेळाडूंनी) गोल केल्याने मलाही आत्मविश्वास मिळाला.'

१० खेळाडूंसह खेळला भारतीय संघ

या सामन्यात भारताच्या अमित रोहिदासला १७ व्या मिनिटाला रेड कार्ड देण्यात आले होते. त्यामुळे भारताला १० खेळाडूंसह हा सामना खेळावा लागला होता. पण असं असलं तरी भारताने ब्रिटनला टक्कर दिली.

कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर ब्रिटनच्या मॉर्टन लीकडून प्रत्युत्तर मिळाले. त्यानेही गोल करत बरोबरी साधली. त्यामुळे सामना संपेपर्यंत १-१ अशी बरोबरी राहिल्याने शूटआऊट झाले.

शूट आऊटमध्ये भारताच्या चारही खेळाडूंनी गोल केले, तर ब्रिटनला दोनदाच गोल करता आला. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT